AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही तर लेडी सचिन पिळगांवकर..; ‘सैराट’च्या पैशांबद्दल रिंकून दिलेलं उत्तर ऐकून चक्रावले नेटकरी

अभिनेत्री रिंकू राजगुरूची ही मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांना पटेल असं तरी खोटं बोलावं, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

ही तर लेडी सचिन पिळगांवकर..; 'सैराट'च्या पैशांबद्दल रिंकून दिलेलं उत्तर ऐकून चक्रावले नेटकरी
Rinku RajguruImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 19, 2026 | 9:56 AM
Share

अभिनेत्री रिंकू राजगुरूने ‘सैराट’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आणि करिअरमधील पहिलाच चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटातून तिला किती पैसे मिळाले आणि त्या पैशांचं तिने काय केलं, असा प्रश्न तिला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर रिंकूने जे उत्तर दिलं, ते ऐकून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. ‘लेडी सचिन पिळगांवकर’ आणि ‘संत्याची बहीण’ अशा शब्दांत तिला नेटकरी ट्रोल करत आहेत.

काय म्हणाली रिंकू?

“किती पैसे मिळाले हे नाही सांगणार पण त्याचं काय केलं हे मात्र सांगेन. मी दहावीची पुस्तकं विकत घेतली. मी कधीच माझ्याजवळ पैसे ठेवत नाही. मला नाही आवडत. मला फक्त एवढं कळतं की.. एवढे एवढे पैसे ठरले आहेत. मी बाबांकडे देते किंवा पूजाकडे देते. मला जसे पैसे लागतील, तसे त्यांच्याकडून मागून घेते. मला आता हे हवंय, हे घेऊन द्या किंवा मला पैसे द्या, मी जाऊन घेते. माझं अकाऊंट बाबा आणि पूजा मॅनेज करतात. माझ्या अकाऊंटमध्ये किती पैसे आहेत, हेसुद्धा मला माहीत नाही. मी त्यांना विचारायलाही जात नाही. मला आवडतही नाही. मला जेवढे पैसे लागतात, मी त्यांच्याकडून मागून घेते. एखाद्या ट्रिपला जायचं असेल तर ती अरेंज करून द्या, असं त्यांना सांगते. माझ्याकडे जी-पे पण नव्हतं, आता काही दिवसांपूर्वी ते सुरू करून दिलं. माझ्याकडे पैसेच नसायचे,” असं तिने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

याविषयी रिंकू पुढे म्हणाली, “आता गुगल पे सुरू केल्याने, जिथे गरज लागते तिथे मी पैसे देते. पण मला पैसे जवळ ठेवायला आवडत नाही. माझ्याकडे काहीच नसतं. सगळं पूजा आणि बाबांकडे असतं. बाबा म्हणतात मला की तू शिक, तेव्हा मी त्यांना म्हणते की हो शिकेन. पण काही शिकले तर नाही अजून. ते बघून घेतील, असं मला वाटतं. कारण आपल्याला लहानाचं मोठं करताना त्यांनी हिशोबाचा विचार केला का? मला एवढंही माहीत आहे की माझ्या कमाईतला ते आठाणा किंवा एक रुपयाही वापरत नाहीत. पुण्यातल्या घराबद्दल पण ते म्हणाले, एवढं सगळं आहे, असं करायचं आहे, तर त्यांना मी म्हणाले की.. घ्या. माझ्यासाठी ते करतात, विचारतात. पण पैसे जवळ ठेवणं, हिशोब करणं मला आवडत नाही.”

रिंकूच्या या उत्तरावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘खोटं बोलतेय’, असं एकाने लिहिलं. तर ‘इथेही अभिनयच सुरू आहे’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘लोकांना पटेल असं तरी खोटं बोलावं’, असं आणखी एका युजरने लिहिलं.

रंजना नागपूरकरांचे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप
रंजना नागपूरकरांचे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप.
विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष? रोहित पवारांचा गौप्यस्फोट!
विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष? रोहित पवारांचा गौप्यस्फोट!.
मुस्लिम आरक्षण रद्द! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप
मुस्लिम आरक्षण रद्द! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप.
भिगवणमध्ये अपहरण की प्रेमप्रकरण? भिगवण प्रकरणात नवं नाट्य
भिगवणमध्ये अपहरण की प्रेमप्रकरण? भिगवण प्रकरणात नवं नाट्य.
अजिदादांच्या अपघाताचे कारण अद्याप न समजल्याने रुपाली पाटलांचा संताप
अजिदादांच्या अपघाताचे कारण अद्याप न समजल्याने रुपाली पाटलांचा संताप.
ब्लॅक बॉक्स खराब, तरी...समजू शकते अजितदादांच्या अपघाताचे कारण
ब्लॅक बॉक्स खराब, तरी...समजू शकते अजितदादांच्या अपघाताचे कारण.
नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांवर मोठे संकट! नेमकं काय झालं?
नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांवर मोठे संकट! नेमकं काय झालं?.
नंदनवन बंगल्यात राज ठाकरे-शिंदे भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
नंदनवन बंगल्यात राज ठाकरे-शिंदे भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण.
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: सीलबंद लिफाफा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: सीलबंद लिफाफा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे.
मुंबईकरांची कोंडी! पारा घसरला तरी खराब हवेची चिंता कायम
मुंबईकरांची कोंडी! पारा घसरला तरी खराब हवेची चिंता कायम.