थिएटरमध्ये गाण्याची पुस्तके, खाद्यपदार्थ विकले, डोअर किपरचा गायक कसा झाला?, वाचा किरण सोनावणेंचा प्रवास!

भीमराव गवळी, Tv9 मराठी

| Edited By: |

Updated on: Aug 17, 2021 | 8:08 AM

आंबेडकरी लोककलावंतांपैकी आवाजाची नैसर्गिक देणगी लाभलेल्या कलावंतांपैकी किरण सोनावणे हे एक आहेत. अभिजात गायनशैली आणि शब्दांवरील प्रभुत्त्व हे किरण सोनावणे यांच्या गायकीचं वैशिष्ट्ये आहे. (kiran sonavane)

थिएटरमध्ये गाण्याची पुस्तके, खाद्यपदार्थ विकले, डोअर किपरचा गायक कसा झाला?, वाचा किरण सोनावणेंचा प्रवास!
kiran sonavane

Follow us on

मुंबई: आंबेडकरी लोककलावंतांपैकी आवाजाची नैसर्गिक देणगी लाभलेल्या कलावंतांपैकी किरण सोनावणे हे एक आहेत. अभिजात गायनशैली आणि शब्दांवरील प्रभुत्त्व हे किरण सोनावणे यांच्या गायकीचं वैशिष्ट्ये आहे. हे वैशिष्ट्ये जपून ठेवण्याचा त्यांनी सदोदित प्रयत्न केला आहे. (doorkeeper to lyricist… know about kiran sonavane)

देवळाली कॅम्प ते ठाणे

किरण बाबुराव सोनावणे हे त्यांचं पूर्ण नाव. त्यांचा जन्म 30 मे 1948चा. नाशिकच्या देवळाली कॅम्पात त्यांचा जन्म झाला. त्यांचं शिक्षण इयत्ता आठवीपर्यंतच झालं. आई-वडील आणि चार भावंडे असा त्यांचा परिवार होता. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांच्या आईला मातीकाम करावं लागलं. आई कामावर गेल्यावर शेजारी राहत असलेली जानका मावशी या भावंडांचा सांभाळ करत असे. कालांतराने त्यांचे वडील बाबुराव सोनावणे हे ठाण्यातील हरिनिवास येथील हिंदुस्थान वायर निटिंग कंपनीत कामाला लागले. त्यामुळे सोनावणे परिवार ठाण्यात आला.

गाण्याची पुस्तके विकली

ठाण्यात आल्यावर सुरुवातीला म्हणजे वयाच्या 9 व्या वर्षी किरण सोनावणे यांनी ठाण्याती प्रभात थिएटरमधील कँटिनमध्ये नोकरी केली. थिएटरमध्ये सुरू असलेल्या सिनेमाच्या गाण्याची पुस्तके आणि खाद्यपदार्थ विकण्याचे काम ते करायचे. त्यानंतर ठाण्याच्या आनंद थिएटरमध्येही त्यांनी काही काळ डोअर किपर म्हणून काम पाहिलं. पुढे 1978मध्ये ठाण्याच्या टेक्निकल हायस्कूलमध्ये त्यांना नोकरी लागली. त्यानंतर त्यांना स्थैर्य मिळालं.

तसं सोनावणे यांच्या घरात गाणं होतं. त्यांची आई यमुनाबाई आणि वडील बाबुराव सोनावणे हे ब्रह्मानंदी कबीरी गाणी गायचे. त्यांची आई तर महाकवी वामनदादा कर्डक यांचीही गाणी गात असे.

शेतकरी राजा भोळा रे,
त्याचा कुणीबी कापतंय गळा…

अशा प्रकारची वामनदादांची गाणी त्यांची आई गायच्या. त्यामुळे लहानपणापासूनच किरण सोनावणे यांच्यावर गाण्याचे संस्कार झाले. याच संस्काराची बीजे मनात उमलली आणि सोनावणे लिहिते झाले. अगदी शालेय वयातच त्यांनी पंडित नेहरु यांच्यावर पहिलं गाणं लिहिलं. त्यावेळी नेहरुंचं निधन झालं होतं. या गीतानंतर गोडी वाढली आणि त्यांच्या लिखाणाचा सपाटा सुरू झाला. (साभार: ‘आंबेडकरी कलावंत’मधून) (doorkeeper to lyricist… know about kiran sonavane)

संबंधित बातम्या:

लिहिता-वाचता येत नव्हतं, पण जिद्दीने शिकले, काचवादक ते शाहीर म्हणून उदय; वाचा एका शाहिराची कथा

बदाम पाडायला गेले अन् बाबासाहेबाचं दर्शन झालं; वाचा, शाहीर यमराज पंडित यांचा अविस्मरणीय किस्सा!

‘शुक्रिया’ ते ‘पोस्ट कामगार’… साजन शिंदेंच्या माहीत नसलेल्या ‘या’ गोष्टी वाचाच

(doorkeeper to lyricist… know about kiran sonavane)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI