लिहिता-वाचता येत नव्हतं, पण जिद्दीने शिकले, काचवादक ते शाहीर म्हणून उदय; वाचा एका शाहिराची कथा

भीमराव गवळी, Tv9 मराठी

| Edited By: |

Updated on: Aug 14, 2021 | 8:26 AM

शाहीर यमराज पंडित यांना गायनाचे धडे मिळाले नाही. त्यांचं शिक्षण चौथीपर्यंत. पण लिहिता वाचता येत नव्हतं. मात्र, जिद्दीने मुळाक्षरे गिरवली आणि लिहायला लागले. (yamraj pandit)

लिहिता-वाचता येत नव्हतं, पण जिद्दीने शिकले, काचवादक ते शाहीर म्हणून उदय; वाचा एका शाहिराची कथा
bheem geet

मुंबई: शाहीर यमराज पंडित यांना गायनाचे धडे मिळाले नाही. त्यांचं शिक्षण चौथीपर्यंत. पण लिहिता वाचता येत नव्हतं. मात्र, जिद्दीने मुळाक्षरे गिरवली आणि लिहायला लागले. पहिलं गीत वयाच्या 22व्या वर्षी लिहिलं. याच काळात त्यांनी काचा वाजवण्याची कला हस्तगत केली. त्यात पारंगत होऊन काचवादक म्हणूनही प्रसिद्ध झाले. (no education, but shahir yamraj pandit achieved success )

वडिल चंदनाच्या पट्ट्या वाजवायचे

शाहीर यमराज पंडित यांच्या घरात गाणं नव्हतं. पण त्यांचे वडील चंदनाच्या पट्ट्या हाताने सुरेख वाजवायचे. पंडितांनी ते पाहून काचेच्या पट्ट्या वाजवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांनी अल्पावधीतच ही कला अवगत केली. तसेच काचवादक म्हणून त्यांची ओळखही निर्माण झाली. सुरुवातीला भायखळ्याच्या माझगाव लव्हलेनमध्ये गायक चंदू थोरात यांच्या विनायक गायन पार्टीत ते काचवादक म्हणून काचा वाजवायचे. त्यानंतर शाहीर विठ्ठल उमप, नवनीत खरे, राजस जाधव आणि गोविंद म्हशीलकरांसह इतर गायकांसाठीही त्यांनी काचवादन केलं.

मुळाक्षरे गिरवली

काच वाजवता वाजवता त्यांनी हिंदी, मराठी गीते लिहिण्यास सुरुवात केली. चौथीपर्यंत शिक्षण होऊनही त्यांना मराठी मुळाक्षरे येत नव्हती. त्यामुळे त्यांनी मुळाक्षरे गिरवायला सुरुवात केली. अपून कुछ लिख नही सकते क्या? असा प्रश्न सतावू लागल्याने त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि ते लिहायला शिकलेही.

आदराने इथे आज पुजाया लाभली, पाऊले श्री भीमाची, दिन अनाथा आम्हा उद्धाराया, लाभले पावले श्रीभीमाची…

पंडित यांनी वयाच्या 22 व्या वर्षी हे पहिलं गाणं लिहिलं. गीतकार, शाहीर म्हणून उदयास येताना त्यांच्या समोर अनेक आदर्श होते. पण गुरू असा कोणीच नव्हता. त्याकाळी गायक श्रावंत यशवंते राहत असलेल्या आंबेवाडीतील फणसाच्या झाडाखाली सर्व गायक कलावंत जमायचे. बौद्ध कला साहित्य संघाचे हे सर्व कलावंत होते. त्यांची मैफल रंगायची. पंडितही या मैफलीत सामील व्हायचे.

वामनदादाची कौतुकाची थाप

पंडित यांनी एकदा एक हिंदी गाणं वामनदादा कर्डक यांना दाखवलं. त्यावर वामनदादांनी गीत दाखवण्यामागचा उद्देश विचारला. त्यावर पंडित म्हणाले, दादा, आम्ही तुम्हाला गुरु मानतो. कुठं चुकतं ते सांगा. वामनदादांनीही ही गीत अत्यंत बारकाईने वाचलं. आणि म्हणाले, यमराज, मराठी लिहायला आम्ही आहोत. तू फ्कत याच मार्गाने जा. हिंदी ऊर्दूत लिहित राहा.

सेवा आणि निवृत्ती

याच काळात मुल्लर अँड फिफ्स इंडिया कंपनीत ते शिपाई म्हणून कामाला लागले. त्यापूर्वी नोबल सायकल अँड मोटार कंपनीत मोटर मॅकनिक म्हणून त्यांनी काम पाहिलं. मात्र, त्यांच्या वडिलांनी त्यांना मुल्लरमध्ये आणलं. त्यांचे वडीलही तिथेच कामाला होते. प्रदीर्घ सेवेनंतर 1985मध्ये पंडित या कंपनीतून निवृत्त झाले. (साभार: आंबेडकरी कलावंत) (no education, but shahir yamraj pandit achieved success )

संबंधित बातम्या:

बदाम पाडायला गेले अन् बाबासाहेबाचं दर्शन झालं; वाचा, शाहीर यमराज पंडित यांचा अविस्मरणीय किस्सा!

‘शुक्रिया’ ते ‘पोस्ट कामगार’… साजन शिंदेंच्या माहीत नसलेल्या ‘या’ गोष्टी वाचाच

गायक साजन शिंदेंची कमाल; जिथे कोरस दिला, तोच स्टेज गायक म्हणून गाजवला!

(no education, but shahir yamraj pandit achieved success )

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI