Saira Banu Birthday : वयाच्या 16 व्या वर्षी दिलीप कुमार यांच्या प्रेमात, अखेरपर्यंत साथ, सायरा बानो यांचे खास किस्से

दिलीप कुमार यांची एक झलक पाहण्यासाठी सायरा या मराठा मंदिरात मुघल-ए-आझम चित्रपट पाहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र तिथे त्या दिलीप कुमार यांना भेटू शकल्या नाही, ज्यामुळे सायरा खूप निराश झाल्या. मात्र, यानंतर सायरा यांनी चित्रपटांमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. (Saira Banu Birthday: In love with Dilip Kumar at the age of 16, Read special stories of Saira Bano)

1/6
आज सायरा बानो यांचा वाढदिवस आहे. या वर्षी त्यांचा वाढदिवस हा त्यांच्यासाठी काही खास नसणार कारण या वर्षी दिलीप कुमार त्यांच्यासोबत नाहीत. लग्नानंतर सायरा यांनी दिलीप कुमारसोबतच प्रत्येक वाढदिवस साजरा केला, मात्र आता त्या एकट्या आहेत. या वर्षी जुलैमध्ये दिलीप कुमार यांचं निधन झालंय.

2/6
सायरा यांनी दिलीप यांच्यावर नेहमीच मनापासून प्रेम केलं. वयाच्या 12 व्या वर्षी सायरा यांनी दिलीप कुमारला आपलं सर्वस्व मानलं. लग्नानंतर सायरा नेहमी दिलीप कुमार यांच्यासोबतच राहिल्या. त्यांच्या शेवटच्या वेळेपर्यंतही सायरा त्यांच्यासोबत होत्या.

3/6
सायरा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की मी फक्त अशी मुलगी नव्हते जी फक्त दिलीप कुमारवर प्रेम करायची. मात्र ऐन चित्रपटात दिलीप कुमारला पाहिल्यानंतर मला वाटलं की मला श्रीमती दिलीप कुमार व्हायचं आहे.

4/6
दिलीप कुमार यांची एक झलक पाहण्यासाठी सायरा या मराठा मंदिरात मुघल-ए-आझम चित्रपट पाहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र तिथे त्या दिलीप कुमार यांना भेटू शकल्या नाही, ज्यामुळे सायरा खूप निराश झाल्या. मात्र, यानंतर सायरा यांनी चित्रपटांमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

5/6
पहिल्या भेटीबद्दल सायरा यांनी सांगितलं त्या म्हणाल्या, जेव्हा मी पहिल्यांदा दिलीप साहेबांना भेटले, तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहून हसून सांगितलं की मी एक सुंदर मुलगी आहे. त्यावेळी असं वाटलं की मला पंख मिळाले आहेत आणि मी उडत आहे. मला माहित नाही का, पण अशी भावना येत होती की मी त्यांची पत्नी होईन. 6 वर्षांनंतर आमचं लग्न झालं.

6/6
2014 साली सायरा दिलीप कुमार यांच्या बद्दल म्हणाल्या, मी अजूनही त्यांच्या प्रेमात वेडी आहे, तो माझा कोहिनूर आहे. आमचं वैवाहिक जीवन खूप चांगलं होतं आणि आमच्या एकमेकांसोबत चांगल्या आठवणी आहेत. प्रत्येक नात्यात प्रेम आणि आदर समान असावेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI