Tunisha Sharma Suicide : ‘तुम क्या हो, नहीं जानते…’; तुनिशाची काळजाला हात घालणारी ‘ती’ पोस्ट व्हायरल…

| Updated on: Dec 25, 2022 | 8:16 AM

जो व्यक्ती आपलं कुटुंब आणि समाजासाठी योगदान देतो, बलिदान देतो, त्याला ओळखण्याची आणि त्याचा सन्मान करण्याची वेळ आली आहे.

Tunisha Sharma Suicide : तुम क्या हो, नहीं जानते...; तुनिशाची काळजाला हात घालणारी ती पोस्ट व्हायरल...
श्रद्धा वालकर हत्येनंतर तुनिशा-शिझानचं ब्रेकअप? चौकशीत सत्य उघड
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पालघर: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने चित्रीकरणाच्या सेटवरच आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येमुळे टीव्ही जगतात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिचा बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शीजान खानला पोलिसांनी अटक केली आहे. शीजानसोबत ब्रेकअप झाल्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. आता तुनिशाची एक जुनी पोस्ट व्हायरल होत आहे. तिने शीजानसाठी ही पोस्ट लिहिली होती.

आलिबाबा या सीरियलच्या सेटवर तुनिशा शर्मा आणि शीजान खानची भेट झाली होती. या सीरियलमध्ये दोघेही मुख्यभूमिकेत होते. रील लाइफमध्ये या जोडीला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत होता. छोट्या पडद्यावर काम करता करता दोघेही चांगले मित्र बनले आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं होतं, अशी माहिती मिळतेय.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांचे भरपूर फोटो शेअर करण्यास सुरुवात केली. तसेच एकमेकांबद्दल दोघेही भरभरून लिहिताना दिसत होते.

इंटरनॅशनल मेन्स डेच्या निमित्ताने तुनिशाने शीजानसाठी एक खास पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट लिहिताना शीजानने तिला उचललेला एक फोटोही शेअर केला होता. या फोटोत तुनिशाच्या चेहऱ्यावर मिलियन डॉलर स्माइल दिसत आहे.

या फोटोखालील पोस्टमध्ये तुनिशा म्हणते, “मला असंच उचलून घेणाऱ्या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा. माझ्या आयुष्यातील सर्वात मेहनती, भावूक, एक्सायटिंग आणि सर्वात सुंदर व्यक्ती. तू काय आहेस हे तुला माहीत नाही आणि हीच सर्वात सुंदर गोष्ट आहे.

जो व्यक्ती आपलं कुटुंब आणि समाजासाठी योगदान देतो, बलिदान देतो, त्याला ओळखण्याची आणि त्याचा सन्मान करण्याची वेळ आली आहे. सर्व पुरुषांना इंटरनॅशनल मेन्स डेच्या शुभेच्छा.”

कोण आहे शीजान मोहम्मद खान?

शीजान मोहम्मद खानचा जन्म 9 सप्टेंबर 1994 रोजी मुंबईत झाला होता. त्याने मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आहे. त्याने अत्यंत कमी वयात मॉडेलिंग आणि अभिनयाला सुरुवात केली. जोधा अकबर सीरियलमध्ये त्याने अकबराच्या लहानपणाची भूमिका साकारली होती.