Uorfi Javed | अखेर कब्रस्तानच्या पत्रावर उर्फी जावेद हिने सोडले माैन, थेट म्हणाली, मी कोणाचीही पर्वा किंवा

उर्फी जावेद ही कायमच तिच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत आहे. उर्फी जावेद ही नुकताच हटके लूकमध्ये दिसलीये. मात्र, यावेळी उर्फी जावेद थोड्या एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आली आहे.

Uorfi Javed | अखेर कब्रस्तानच्या पत्रावर उर्फी जावेद हिने सोडले माैन, थेट म्हणाली, मी कोणाचीही पर्वा किंवा
| Updated on: Mar 12, 2023 | 6:41 PM

मुंबई : उर्फी जावेद हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही तिच्या अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते. अनेकदा उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होते. इतकेच नाहीतर तिच्या कपड्यांमुळेच तिला जीवे मारण्याच्या थेट धमक्या देखील दिल्या जातात. नुकताच उर्फी जावेद ही हटके लूकमध्ये दिसलीये. मात्र, लोकांना हा तिचा लूक अजिबात आवडलेला दिसत नाहीये. उर्फी जावेद हिच्या व्हिडीओवर (Video) कमेंट करत काही युजर्स तिचा समाचार घेताना दिसत आहे. अनेकांना उर्फी जावेद हिची ही अतरंगी स्टाईल अजिबातच आवडत नाहीये.

नुकताच उर्फी जावेद ही एका पत्रामुळे चर्चेत आलीये. मिळालेल्या माहितीनुसार उर्फीच्या नावाने मुंबईतील अनेक कब्रस्तानांमध्ये एक पत्र दिले जात आहे, ज्यामध्ये मृत्यूनंतर उर्फीला कुठेही दफन करण्यासाठी जागा मिळू नये, असे लिहिले आहे. यामुळे उर्फी जावेद ही चर्चेत आलीये. मात्र, हे पत्र नेमके कोणी लिहिले हे अजून कळू शकले नाही.

आता यावर उर्फी जावेद हिची प्रतिक्रिया पुढे आलीये. यावर उर्फी जावेद हिने चांगलाच समाचार घेतल्याचे दिसत आहे. उर्फी जावेद म्हणाली की, लोकांकडे एवढा जास्त रिकामा वेळ असतो की ते अशाप्रकारची कामेही करतात… या लोकांना प्रसिध्दीची जास्त हाव आहे वाटतं, मी माझे आयुष्य हे स्वतःच्या अटींवर जगते, मी कोणाचीही पर्वा अजिबात करत नाही.

उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांच्या स्टाईलमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते . काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी एका ब्रोकरने दिली होती. या ब्रोकरच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला बिहारमधून अटक केली होती. विशेष म्हणजे हा ब्रोकर उर्फी जावेद हिच्या ओळखीमधील होता. त्याने मेसेज करून उर्फी जावेद हिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने शर्ट न घालता एक फोटोशूट केले होते. यावेळी उर्फी जावेद हिने हातामध्ये नाश्त्याची प्लेट घेतली होती. या फोटोशूटनंतर उर्फी जावेद हिच्यावर टिका करण्यात आली. उर्फी जावेद हिच्या या फोटोशूटचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. उर्फी जावेद ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. कायमच आपल्या चाहत्यांसाठी उर्फी जावेद ही बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.