धर्मेंद्र यांच्या पायाजवळ चक्क 15 मिनिटे बसला सलमान खान, ‘तो’ फोटो तूफान व्हायरल, वाचा काय घडले?

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत त्याच्या टायगर 3 या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. सलमान खान याच्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

धर्मेंद्र यांच्या पायाजवळ चक्क 15 मिनिटे बसला सलमान खान, तो फोटो तूफान व्हायरल, वाचा काय घडले?
| Updated on: Oct 18, 2023 | 6:23 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी एक मोठा काळ बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटांमध्ये गाजवलाय. धर्मेंद्र हे काही दिवसांपूर्वीच राॅकी आैर रानी की प्रेम कहानी या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसले. धर्मेंद्र (Dharmendra) यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. धर्मेंद्र हे सोशल मीडियावर सक्रिय देखील असतात. काही दिवसांपूर्वीच धर्मेंद्र यांनी एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र हे व्यायाम करताना दिसले.

धर्मेंद्र हे काही दिवसांपूर्वी आपल्या लेकासोबत विदेशात धमाल करताना दिसले. धर्मेंद्र आणि सनी देओल हे विदेशात पिझ्झा खाताना दिसले. यावेळी धर्मेंद्र हे सनी देओल याचे काैतुक करताना देखील दिसले. आपल्या चाहत्यांचे धन्यवाद मानताना देखील धर्मेंद्र हे दिसले. सनी देओल याच्या चित्रपटाला प्रेम दिल्याने त्यांनी सर्वांचे आभार मानले.

सध्या सोशल मीडियावर एक फोटो तूफान व्हायरल होताना दिसतोय. या फोटोमध्ये दबंग खान अर्थात सलमान खान हा धर्मेंद्र यांच्या पायाजवळ बसलेला दिसतोय. सलमान खान आणि धर्मेंद्र यांचा हा फोटो तूफान व्हायरल होतोय. मुळात म्हणजे व्हायरल होणारा हा फोटो हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतील आहे.

अत्यंत जवळच्या लोकांना या पार्टीचे निमंत्रण होते. यावेळी धर्मेंद्र हे आपले जुने किस्से लोकांना सांगताना दिसले. पार्टीमध्ये सलमान खान हा पोहचल्यावर धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी गेला. यावेळी चक्क 15 मिनिटे सलमान खान हा धर्मेंद्र यांच्या पायाजवळ खाली बसून त्यांना गप्पा मारताना दिसला. लोकांना हा फोटो खूप जास्त आवडलाय.

धर्मेंद्र आणि सलमान खान यांच्यामध्ये एक खूप चांगले नाते आहे. सलमान खान हा धर्मेंद्र यांना आपल्या वडिलांप्रमाणे मानतो. तो नेहमीच धर्मेंद्र यांचा सन्मान करताना दिसतो. आता हा फोटो पाहून हे स्पष्ट झालंय की, सलमान खान आणि धर्मेंद्र यांचे नाते किती जास्त चांगले आहे. लोक धर्मेंद्र आणि सलमान खान यांच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे या फोटोमध्ये धर्मेंद्र यांच्या बाजूला हेमा मालिनी या बसलेल्या देखील दिसत आहेत. या पार्टीमध्ये सलमान खान हा अगदी वेळेवर पोहचल्याचे सांगितले जातंय. हेमा मालिनी यांच्यासोबत देखील खास फोटो काढताना सलमान खान हा दिसलाय. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.