AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जा.. जेव्हा हेमा मालिनी यांचे वडील धर्मेंद्र यांच्यावर ओरडले

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये लग्न केलं. त्यावेळी धर्मेंद्र हे आधीच विवाहित होते आणि त्यांना चार मुलं होती. सनी, बॉबी ही दोन मुलं आणि विजेता, अजेता या दोन मुली त्यांना होत्या. प्रकाश कौर असं त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे. धर्मेंद्र हे आजही प्रकाश कौर यांच्यासोबत राहतात.

तू माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जा.. जेव्हा हेमा मालिनी यांचे वडील धर्मेंद्र यांच्यावर ओरडले
हेमा मालिनी, धर्मेंद्र
| Updated on: Oct 16, 2023 | 7:59 PM
Share

मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : 70 आणि 80 च्या दशकात बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अनेकांच्या हृदयावर राज्य केलं. मात्र जेव्हा त्यांनी अभिनेते धर्मेंद्र यांच्याशी लग्न केलं, तेव्हा त्या सर्वांचाच हृदयभंग झाला. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या जोडीकडे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हेमा मालिनी यांची आई जया चक्रवर्ती आणि वडील व्ही. एस. रामानुजन चक्रवर्ती यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतच्या लग्नाला स्पष्ट नकार दिला होता. कारण त्यावेळी धर्मेंद्र आधीच प्रकाश कौर यांच्याशी विवाहित होते. धर्मेंद्र यांच्यापासून हेमा मालिनी यांना दूर करण्यासाठी तिच्या वडिलांनी बरेच प्रयत्न केले होते. अभिनेते जितेंद्र यांच्याशीही त्यांनी मुलीचं लग्न ठरवण्याचा प्रयत्न केला होता.

हेमा मालिनी आणि जितेंद्र

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लव्ह-स्टोरी एका चित्रपटाच्या कथेला शोभावी अशीच आहे. या दोघांची प्रेमकहाणी सर्वांत आधी हेमा यांच्या आईला समजली. मात्र त्यावेळी मुलीसाठी जया यांच्या मनात दुसराच मुलगा होता. 1974 मध्ये त्यांनी हेमा यांना अभिनेते जितेंद्र यांच्या आईवडिलांना भेटण्यासाठी सांगितलं होतं. दोन्ही कुटुंबीयांना हे स्थळ मंजूर होतं. अखेर लग्नासाठी ते मद्रासला निघून गेले. मात्र जितेंद्र यांना हेमा मालिनी यांच्याशी लग्न करायचं नव्हतं. कारण त्या धर्मेंद्र यांच्यावर प्रेम करत असल्याचं त्यांना माहीत होतं. पण कुटुंबीयांना लग्न मान्य असल्याने जितेंद्र तयार झाले होते.

विवाहस्थळी धावून आले धर्मेंद्र

हेमा मालिनी आणि जितेंद्र यांच्या लग्नाविषयी कमालिची गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र एका वृत्त मासिकाला याची खबर कळाली आणि त्यांनी ती छापली. हे वृत्त वाचताच धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्याकडे गेले. त्यांना पाहून हेमा मालिनी यांचे वडील ओरडले, “तू माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून का जात नाहीस? तुझं लग्न झालंय, तू माझ्या मुलीशी लग्न करू शकत नाही.” त्यावेळी धर्मेंद्र हे हेमा मालिनी यांच्या प्रेमात अक्षरश: वेडे होते. अखेर ते हेमा मालिनी यांच्या रुममध्ये गेले आणि त्यांच्यासमोर जितेंद्र यांच्याशी लग्न न करण्याची विनंती केली.

या घटनेनंतर हेमा मालिनी रुमबाहेर आल्या आणि त्यांनी जितेंद्र यांच्या कुटुंबीयांकडे थोडा वेळ मागितला. पण तेसुद्धा ऐकण्यास तयार नव्हते. त्यांनी हेमा यांना अल्टिमेटम दिला आणि विवाहस्थळावरून ते निघून गेले. अखेर 2 मे 1980 रोजी दोघांनी लग्न केलं. “ते माझ्या आईसारखेच आहेत. ते माझ्यासमोर कधीच माझं कौतुक करत नाहीत. पण माझ्या मागे भरभरून कौतुकास्पद बोलतात. तू ठीक आहेस का, असं ते आईसारखंच मला विचारतात. कदाचित याच गोष्टींमुळे मी त्यांच्याकडे आकर्षित झाले होते”, असं हेमा मालिनी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.