AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युतीचं कुठं घडलंय, कुठे बिघडलंय… पाहा 29 महापालिकेची डिटेल्स

Mahayuti : राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज भाजप आणि शिवसेनेची युती कोणत्या महानगर पालिकेत झाली आणि कोणत्या महानगर पालिकेत तुटली याबाबत माहिती जाणून घेऊयात.

युतीचं कुठं घडलंय, कुठे बिघडलंय... पाहा 29 महापालिकेची डिटेल्स
Shivsena and BJPImage Credit source: TV 9 Marathi
| Edited By: | Updated on: Dec 30, 2025 | 9:27 PM
Share

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज यासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज सर्व पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीसाठी राज्यात वेगवेगळी समीकरणे पहायला मिळत आहेत. काही ठिकाणी महामयुतीतील पक्षांनी युती केली आहे, तर काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनीही काही ठिकाणी आघाडी केली आहे, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक ठिकाणी युती आणि आघाडीसाठी मोठ्या प्रमाणात बैठका झाल्या, मात्र तोडगा निघालेला नाही. आज आपण भाजप आणि शिवसेनेची युती कोणत्या महानगर पालिकेत झाली आणि कोणत्या महानगर पालिकेत तुटली याबाबत माहिती जाणून घेऊयात.

संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने युती केली आहे. मुंबईतील 227 पैकी 90 जागांवर शिवसेना लढणार आहे, तर 137 जागांवर भाजप मैदानात उतरणार आहे. तसेच दोन्ही पक्ष आपल्या मित्र पक्षांना आपल्याला कोट्यातून जागा देणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. मुंबईसह ठाणे, जळगाव, नागपूर या प्रमुख महानगर पालिकांच्या निवडणुकीतही या दोन्ही पक्षांनी युती केली आहे. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबईसह प्रमुख महानगर पालिकांच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी वेगळे लढण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप-शिवसेना युती नसलेल्या महापालिका

  1. पुणे
  2. छत्रपती संभाजी नगर
  3. नाशिक
  4. नांदेड
  5. अमरावती
  6. मालेगाव
  7. अकोला
  8. मीरा-भाईंदर
  9. नवी मुंबई
  10. धुळे
  11. उल्हासनगर
  12. सांगली
  13. जालना
  14. पिंपरी चिंचवड
  15. परभणी
  16. सोलापूर
  17. लातूर
  18. अहिल्यागर

भाजप-सेना या जागांवर एकत्र लढणार

  1. मुंबई
  2. ठाणे
  3. जळगाव
  4. पनवेल
  5. नागपुर
  6. भिवंडी
  7. कोल्हापूर
  8. चंद्रपूर
  9. वसई विरार
  10. कल्याण डोंबिवली
  11. इचलकरंजी

मुंबईत शिवसेना मनसेची युती

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे. तर काँग्रेसने वंचितसोबत युती केली आहे. या सर्व पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. आता उद्या अर्जांची छाणनी होणार आहे, तर 2 तारखेपर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे. 3 तारखेला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होऊन चिन्हवाटप होणार आहे. 15 तारखेला मतदान होऊन 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे.

Follow Us
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज...
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज पुन्हा कोअर कमिटीची मिटिंग सुरु
राजकीय हालचालींना वेग! निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचं...
राजकीय हालचालींना वेग! पुण्यातील निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचा थेट चंद्रकांत पाटलांना फोन
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित, दिल्लीत हालचालींना वेग