Video | मलायका अरोरा दिसली थरथर कापताना, मुंबईच्या भर पावसात अभिनेत्रीसोबत घडला ‘हा’ प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना कायमच दिसतात. मलायका अरोरा हिने काही दिवसांपूर्वीच ग्रीन रंगाच्या साडीवर खास फोटोशूट केले होते.

Video | मलायका अरोरा दिसली थरथर कापताना, मुंबईच्या भर पावसात अभिनेत्रीसोबत घडला हा प्रकार, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Aug 10, 2023 | 5:55 PM

मुंबई : मलायका अरोरा हिने काही दिवसांपूर्वीच ग्रीन रंगाच्या साडीवर खास फोटोशूट केले होते. मलायका अरोरा (Malaika Arora) हिच्या या फोटोशूटमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळाले होते. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. मलायका अरोरा ही सोशल मीडियावर कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा ही अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे.

काही दिवसांपूर्वीच अर्जुन आणि मलायका विदेशात धमाल करताना दिसले. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे कायमच स्पाॅट होतात. विशेष म्हणजे अर्जुन कपूर याने विदेशामधील मलायका अरोरा हिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अनेकांना अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांची जोडी प्रचंड आवडते.

चाहते यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. नुकताच मलायका अरोरा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. मलायका अरोरा हिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही भर पावसामध्ये छत्री घेऊन जाताना दिसत आहे. मात्र, अचानक असे काही घडते की, अभिनेत्रीचा थरकाप उडतो.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मलायका अरोरा पावसामध्ये छत्री घेऊ जात असतानाच तिच्या बाजूला कुठल्यातरी वस्तूचा स्फोट होतो. मात्र, स्फोटाचा आवाज ऐकून मलायका अरोरा घाबरते. इतकेच नाही तर मलायका अरोरा इतके जास्त घाबरते की, तिथून लगेचच निघून जाते.

यावेळी मलायका अरोरा हिच्या भोवती मोठी गर्दी देखील दिसत आहे. मलायका अरोरा हिचा आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. मलायका अरोरा हिच्या या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करताना देखील दिसत आहेत. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, मॅडम इतके घाबरण्यासारखे काय घडले?

दुसऱ्याने लिहिले की, या लोकांना रस्त्याने चालण्याची अजिबातच सवय नसल्याने या अशा आवाजांमुळे त्यांना भीती वाटते. तिसऱ्याने लिहिले की, मॅडम तुमच्या बाजूला इतके लोक असताना तुम्हाला घाबरण्याची काय गरज आहे. मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत असते.