
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांना अनेक मोठे कलाकार घाबरायचे. पण एक असा अभिनेता होता, ज्याच्यासमोर खुद्द दिलीप कुमारही उभे राहायलाही घाबरायचे आणि त्यांना घाम फुटायचा. तो अभिनेता म्हणजे ओम प्रकाश. ओम प्रकाश हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता होते. सहाय्यक भूमिका करणाऱ्या ओम प्रकाश यांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले होते.
पडद्यावर ओम प्रकाश यांनी दिलीप कुमार यांच्यासोबतही काम केले आहे. त्यांनी विनोदी, खलनायकी आणि कौटुंबिक व्यक्तिरेखा अशा विविध भूमिका साकारल्या. मित्र, भाऊ, आजोबा, वडील अशा अनेक भूमिका करून त्यांनी सहाय्यक अभिनेता म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
वाचा: मी तुझ्यासमोरच कपडे बदलले तर चालेल का? अभिनेत्रीने सख्ख्या भावालाच विचारला प्रश्न
ओम प्रकाश यांच्यासमोर घाबरायचे दिलीप कुमार
दिलीप कुमार यांनी बॉलिवूडमध्ये 56 वर्षे काम केले, तर ओम प्रकाश यांचे करिअरही 50 वर्षांहून अधिक काळाचे होते. दिलीप कुमार हे अनेक कलाकारांचे आदर्श होते. पण त्यांनी स्वतः ओम प्रकाश यांच्यासोबत काम करताना कमीपणा जाणवायचा. त्यांनी एकदा ओम प्रकाश यांच्याबद्दल सांगितले की, “मी त्यांच्यासोबत काम करताना घाबरायचो.” दिलीप यांनी ओम यांची प्रशंसा करताना म्हटले की, ते खूप मोठे आणि कसलेले अभिनेता होते.
12व्या वर्षी शिकू लागले शास्त्रीय संगीत
ओम प्रकाश यांचा जन्म 19 डिसेंबर 1919 रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये झाला. अभिनयाचे जाणकार असलेल्या ओम यांनी वयाच्या 12व्या वर्षी शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली होती. पण त्यांचा कल अभिनयाकडेच होता. मोठे झाल्यावर त्यांनी अभिनेत्याची कारकीर्द निवडली. ओम यांनी बॉलिवूडमध्ये 1944 मध्ये ‘दासी’ या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात दिग्गज अभिनेता प्राण यांनीही काम केले होते.
300 हून अधिक चित्रपटांमध्ये केले काम
‘दासी’ चित्रपटातून सुरुवात केल्यानंतर ओम यांनी ‘हावडा ब्रिज’, ‘दस लाख’, ‘प्यार किये जा’, ‘पडोसन’, ‘बुड्ढा मिल गया’, ‘चुपके चुपके’, ‘नमक हलाल’, ‘गोल माल’, ‘चमेली की शादी’, ‘शराबी’ आणि ‘लावारिस’ यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 310 हून अधिक चित्रपट केले. तसेच, ‘संजोग’ आणि ‘गेटवे ऑफ इंडिया’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. या दिग्गज व्यक्तिमत्त्वाचे 1998 मध्ये वयाच्या 78व्या वर्षी निधन झाले.