Pushpa 2 The Rule | ‘पुष्पा 2’चा डबल धमाका, ‘या’ दिवशी येणार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, ‘झुकेगा नहीं साला’

पुष्पा या चित्रपटाने मोठा धमाका केला. पुष्पा हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले. पुष्पा चित्रपटाला मोठा जलवा हा थिएटरमध्ये बघायला मिळाला. आता नुकताच पुष्पा 2 बद्दल अत्यंत मोठी अपडेट पुढे आलीये.

Pushpa 2 The Rule | पुष्पा 2चा डबल धमाका, या दिवशी येणार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, झुकेगा नहीं साला
Pushpa 2
| Updated on: Sep 11, 2023 | 5:24 PM

मुंबई : पुष्पा या चित्रपटाने मोठा धमाका केला. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत पुष्पा चित्रपटाची क्रेझ बघायला मिळाली. अल्लू अर्जुन याचा पुष्पा (Pushpa) हा चित्रपट सुपरहिट ठरला. विशेष म्हणजे कोरोनानंतर या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केली. पुष्पा चित्रपटासाठी अल्लू अर्जुन (Allu Arjun) याला अनेक पुरस्कार देखील मिळाले. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक हे पुष्पा 2 ची आतुरतेने वाट पाहताना दिसले. इतकेच नाही तर चित्रपटाची शूटिंगही सुरू होती. पुष्पा 2 च्या प्रत्येक अपडेटवर चाहत्यांच्या नजरा दिसल्या.

काही दिवसांपूर्वीच रश्मिका मंदाना हिने पुष्पा 2 चित्रपटाच्या सेटवरील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पुष्पा 2 द रूल बद्दल आता एक अत्यंत मोठे आणि महत्वाचे अपडेट पुढे आले आहे. यामुळे चाहत्यांमध्ये मोठा उत्साह हा बघायला मिळत आहे. चाहते ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, शेवटी त्याबद्दल माहिती पुढे आलीये.

पुष्पा 2 द रूल चित्रपटाची नुकताच रिलीज डेट जाहिर करण्यात आलीये. विशेष बाब म्हणजे पुढच्याच वर्षी पुष्पा 2 द रूल हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसणार आहे. नुकताच निर्मात्यांकडून पुष्पा 2 द रूल ची रिलीज डेट जाहिर करण्यात आलीये. यामुळे चाहत्यांचा आनंद हा गगणात मावताना दिसत नाही.

पुष्पा 2 द रूल हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपट मोठा धमाका करणार हे नक्कीच आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये मोठा धमाका करताना दिसेल. विशेष बाब म्हणजे पुष्पा 2 द रूल हा चित्रपट अनेक भाषांमध्येही रिलीज होणार आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुन याचा लूकही पुढे आलाय.

पुष्पा 2 द रूल चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यांची जोडी परत एकदा धमाल करताना दिसले. पुष्पा चित्रपटातील अनेक गाणेही हिट ठरले. लहान मुले चित्रपटातील गाण्यावर धमाकेदार पद्धतीने डान्स करताना देखील दिसले. आता चाहते 15 ऑगस्ट 2024 आतुरतेने वाट पाहत आहेत. यादिवशी डबल धमाका होणार आहे.