अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या चमकदार त्वचेचे रहस्य सांगितलं; पाण्यात मिसळायची फक्त ही एक गोष्ट

अभिनेत्री भाग्यश्री आपल्या डाएटबाबत आणि आरोग्याबाबत किती काटेकोर आहे हे सर्वांना माहित आहे. ती चाहत्यांना त्वचा आणि आरोग्याशी संबंधित टिप्स देतच असते. तिने त्वचा निरोगी आणि तरूण दिसण्यासाठी एक खास उपाय सांगितला आहे. तिने असे एक जादुई पाणी सांगितले आहे ज्यामुळे नक्कीच 15 दिवसांत फरक दिसण्यास मदत होते.

अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या चमकदार त्वचेचे रहस्य सांगितलं; पाण्यात मिसळायची फक्त ही एक गोष्ट
Bhagyashree glowing skin, saffron water for glowing skin
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 09, 2025 | 4:23 PM

त्वचेची काळजी घेण्यासाठी, चेहऱ्यावर केवळ बाहेरून क्रीम किंवा वेगवेगळे स्किन केअर प्रोडक्ट्स लावल्याने उपयोग होत नाही. तर अंतर्गत त्वचा सुधारणे देखील आवश्यक आहे. व्यवस्थित डाएट घेतल्याने त्वचा आतून चांगली होते, ज्याचा परिणाम बाहेरूनही दिसून येतो. जर त्वचा आतून डिटॉक्स केली तर ती बाहेरून देखील मऊ होते. सेलिब्रिटी देखील हाच फंडा पाळतात. अभिनेत्री भाग्यश्रीचाही या सेलिब्रिटींमध्ये समावेश आहे. भाग्यश्री अनेकदा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्वचा आणि आरोग्याशी संबंधित टिप्स शेअर करते. अशाच एका व्हिडिओमध्ये भाग्यश्रीने तिच्या सौंदर्याचं म्हणजेच तिच्या ग्लोईंग स्किनचं सिक्रेट सांगतिलं आहे. पाण्यात फक्त एक गोष्ट मिसळून 15 दिवस प्यायल्याने त्वचा सुधारते आणि त्याच वेळी चेहऱ्यावरील डाग देखील कमी होऊ लागतात. भाग्यश्रीने सांगितलेले हे पेय तुम्ही देखील पिऊ शकता. पाहुयात हे पेय नक्की कसे बनवायचे.

भाग्यश्रीने नक्की काय म्हटलं आहे

भाग्यश्री म्हणते की धूळ आणि घाणीमुळे त्वचेवर खूप परिणाम होतो. अशा परिस्थितीत, त्वचेला अंतर्गतरित्या बळकटी देण्यासाठी ती जे पाणी पिते ते म्हणजे केसर पाणी. ती म्हणते चमकदार त्वचेसाठी केशर पाणी प्यायला हवे. यामुळे त्वचा निस्तेज होण्यापासून आणि कोरडी होण्याला आळा बसतो. त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी देखील हा उपाय प्रभावी आहे.

कसे बनवायचे केशर पाणी

हे पाणी तयार करण्यासाठी कोमट पाण्यात 10 ते 15 केशराच्या काड्या टाकाव्या आणि ते दररोज रिकाम्या पोटी प्यावे. भाग्यश्री म्हणते की जेव्हा पाणी हलके केशरी रंगाचे दिसू लागते तेव्हाच हे पाणी प्या. 15 दिवस हे पाणी प्यायल्यानंतर त्वचेत आश्चर्यकारक परिणाम दिसू लागतात.


केशर पाणी पिण्याचे फायदे

केशर पाणी पिण्याने केवळ त्वचेलाच फायदा होत नाही तर अनेक आरोग्यदायी फायदे देखील मिळतात. केशर पाणी पिण्याने गोड पदार्थांची तल्लफ कमी होऊ शकते.
केशर पाणी केसांची गुणवत्ता सुधारते हे सिद्ध झाले आहे. ते केस गळणे देखील कमी करू शकते.

 मासिक पाळी उशिरा येत असेल तर…

केशरमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे आरोग्य निरोगी ठेवतात. अँटी-ऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे, केशर पाणी शरीराला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. जर मासिक पाळी उशिरा येत असेल किंवा अनियमित असेल तर केशर पाणी उपयुक्त ठरू शकते. ते प्यायल्याने मासिक पाळी येण्यास मदत होते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक केशर पाणी पिऊ शकतात. केशर पाणी भूक कमी करण्यासाठी प्रभावी आहे, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत करते.