Bigg Boss 17 मध्ये होणार धमाका, मुनवर फारुकीवर आरोप करणाऱ्या आयेशा खानची होणार एन्ट्री?

Bigg Boss 17 : सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस 17'मध्ये पुन्हा एकदा वाइल्डकार्ड येणार असल्याची चर्चा आहे. आयशा खान वाइल्डकार्डच्या रुपात शोमध्ये एंट्री करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जाणून घ्या कोण आहे आयशा खान.

Bigg Boss 17 मध्ये होणार धमाका, मुनवर फारुकीवर आरोप करणाऱ्या आयेशा खानची होणार एन्ट्री?
| Updated on: Dec 15, 2023 | 4:48 PM

मुंबई : ‘बिग बॉस 17’ सध्या नव्या उमेदवाराची एन्ट्री होणार आहे. या शोमध्ये निर्माते एक नवा धमाका करणार असल्याची बातमी समोर येत आहे. आयशा खानला निर्माते वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आणणार आहेत. आयशा खान हिचे नाव मुनव्वर फारुकीसोबत जोडले जाते. तिने त्याच्यावर टू-टाईमिंगचा आरोपही केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली होती.

निर्माते मुनवर फारुकीच्या विरुद्ध आयशा खानला एंट्री देणार आहेत. वीकेंड का वार स्पेशलमध्ये ती सहभागी होणार आहे. मुनावर फारुकीसोबत तिच्या लव्ह लाईफचा खुलासा करणार आहे. आता हे दोघे समोरासमोर येणार असल्याने चाहते त्यांना पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. आयशा खान स्टँडअप कॉमेडियनबद्दल काय खुलासा करणार आहे आणि मुनव्वर टू-टाईमिंगचे आरोप स्वीकारणार का हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.


आयशा खानने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मुनवर फारुकी यांचे नाव न घेता टू टाइमिंगचा आरोप केला होता. अभिनेत्रीने सांगितले होते की शोचा एक स्पर्धक आहे, जो घटस्फोटित आहे आणि एका मुलाचा पिता आहे. त्याने त्याच्या गर्लफ्रेंडलाही डेट केले आहे. आयशा खानच्या या आरोपांमुळे इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. यानंतर आता बिग बॉसच्या निर्मात्यांनी आयशा खानला शोमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. अशा परिस्थितीत पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.