आयुषमान खुरानाला धमकीची ऑडिओ क्लिप, कोट्यवधींची मागणी अन्… धक्कादायक माहिती समोर
बॉलिवूड कलाकारांना बिश्नोई गँगच्या नावाने येणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच. अभिनेता आयुष्मान खुरानाला लॉरेन्स गँगच्या नावाने धमकीचा ऑडिओ मेसेज आल्याची माहिती. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

बॉलिवूड सेलिब्रिटी सध्या मोठ्या दहशतीखाली आहेत. कारण अभिनेता सलमान खान याच्यानंतर अनेक सेलिब्रिटींना जीवे मारण्याची आणि खंडणीसाठी कॉल आणि ईमेल येत आहेत. आता गायक आणि अभिनेता याला देखील धमकीचा ऑडिओ क्लिप आल्याची माहिती समोर येत आहे. बॉलिवूड कलाकारांना बिश्नोई गँगच्या नावाने येणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच आहे. अभिनेता आयुष्मान खुरानाला लॉरेन्स गँगच्या नावाने धमकीचा ऑडिओ मेसेज आल्याची माहिती समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
अभिनेता आयुष्मान खुरानाला देखील धमकीचा ऑडिओ क्लिप मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीने आपण लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. आयुष्मान खुरानाकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
धमकी देणाऱ्या व्यक्तीने सांगितलेल्या नावाचा आवाज पोलिसांकडील रेकॉर्डमधील ऑडिओशी जुळवण्याचे काम सुरु आहे. यापूर्वी अभिनेता तुषार कपूरलाही हॅरी बॉक्सरच्या नावाने धमकीचा ऑडिओ मेसेज आला होता. मात्र तुषार कपूर प्रकरणातील ऑडिओ प्राथमिक तपासात बनावट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
धमकी देणाऱ्या व्यक्ती किंवा टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तपासणी सुरू. अभिनेता तुषार कपूर याला लॉरेन्स गँगचा सदस्य हॅरी बॉक्सर याच्या नावाने फोन आल्याची माहिती समोर येत असून, तुषार याच्याकडे तब्बल 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली.
रिपोर्टनुसार, तुषार कपूर याने आलेल्या धमकीच्या कॉलची सर्व माहिती पोलिसांना दिली आहे. अभिनेत्याच्या तक्रारीनंतर याप्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली आहे. सध्या पोलिसांचं पथक याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.
सांगायचं झालं तर, मुंबईतील जुहू येथे 18 ऑक्टोबर रोजी अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई क्राइम ब्रँचने कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रणबीर कपूर याच्या घरावर देखील हल्लेखोरांनी लक्ष ठेवले होते. त्याच्या वांद्र्याच्या पाली हिल येथील निवासस्थानाची आरोपींनी रेकी केल्याचं तपासत निष्पन्न आले. बॉलीवूडमधल्या अनेक बड्या कलाकारांच्या घरांची हल्लेखोरांनी रेकी केल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली.