अपरात्री घाणेरडे मेसेज अन्…ट्रान्सजेंडर अभिनेत्रीनं सांगितली आपबिती, केली बिग बॉसची पोलखोल

बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या अभिनेत्री शुभी शर्मा हिने मनोरंजन विश्वातील अनुभवांबाबत मोठा खुलासा केला आहे. तिने नेमकं काय म्हटलं आहे?

| Updated on: Oct 27, 2026 | 11:01 PM
1 / 5
अनुपमा' आणि 'प्रतिज्ञा 2' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलेल्या ट्रान्सजेंडर अभिनेत्री शुभी शर्मा हिनं टीव्ही इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. 'टर्निंग टेल्स' पॉडकास्टमध्ये तिनं तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

अनुपमा' आणि 'प्रतिज्ञा 2' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलेल्या ट्रान्सजेंडर अभिनेत्री शुभी शर्मा हिनं टीव्ही इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. 'टर्निंग टेल्स' पॉडकास्टमध्ये तिनं तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

2 / 5

'बिग बॉस'शी संबंधित क्रिएटिव्ह टीममधील एका तरुणानं काम मिळवण्यासाठी तडजोड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शुभीनं केला. दिवसा तो प्रोफेशनल पद्धतीनं बोलण्याचा सल्ला देत होता, मात्र रात्री त्याचं वागणं बदलत असल्याचं तिनं सांगितलं.

3 / 5

संबंधित तरुणानं इन्स्टाग्रामवर डिसअपीअरिंग मोड सुरू करून रात्री 2 वाजता 'हाय' आणि 'हाय बेबी' असे मेसेज पाठवल्याचा दावा शुभीनं केला. मेसेज पाहिल्यानंतर ते गायब होण्यापूर्वी तिनं दुसऱ्या फोनमधून चॅटचे फोटो काढून पुरावे जपून ठेवले.

4 / 5

काम मिळालं नाही तरी वन नाइट स्टँड किंवा कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नसल्याचं शुभीनं स्पष्ट केलं. यापुढे 'बिग बॉस'मध्ये बोलावलं नाही तरी चालेल, पण स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही, अशी ठाम भूमिका तिनं मांडली.

5 / 5

प्रॉडक्शन टीममध्ये चुकीच्या हेतूनं वागणारे लोक असल्यास गुणवान कलाकारांना संधी कशी मिळणार, असा सवाल शुभीनं उपस्थित केला. अशा प्रकारांमुळे मोठे टीव्ही शोजही आपलं नाव गमावत असल्याची नाराजी तिनं व्यक्त केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us