
बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेनंतर प्रेक्षक या शोचा टीआरपी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. टेलिव्हिजनविश्वात असा अंदाज वर्तवला जात होता की बिग बॉस फिलानेचा टीआरपी हा 2.5 पर्यंत जाऊ शकतो. मात्र सलमान खानच्या या शोने जाता जाता कलर्स टीव्हीला मोठी भेट दिली आहे.

बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेनं लोकप्रिय 'अनुपमा' या मालिकेला मोठा झटका दिला आहे. अनुपमा ही मालिका नेहमीच टीआरपी चार्टवर पहिल्या क्रमांकावर असते. आता त्याची जागा बिग बॉस 16 ने घेतली आहे. बिग बॉस 16 ला 3.1 टीआरपी रेटिंग मिळाली आहे.

गेल्या वर्षभरापासून पहिल्या क्रमांकावर असलेली 'अनुपमा' ही मालिका या आठवड्यात दुसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचली आहे. या आठवड्याचा 'अनुपमा'चा टीआरपी 2.8 इतका आला आहे. मात्र पुढच्या आठवड्यात ही मालिका पुन्हा पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो. कारण बिग बॉसचा शो आता संपला आहे.

'गुम है किसी के प्यार में' या मालिकेचा टीआरपी 2.6 इतका आहे. अनुपमा ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आल्याने 'गुम है किसी के प्यार में' ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.

2.2 टीआरपीसह 'इमली' या आठवड्यात चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. अनेकदा इमलीकडून 'अनुपमा' मालिकेला चांगली टक्कर मिळते.