
Mahhi Vij Jay Bhanushali Divorce Rumours: टीव्ही विश्वातील पॉव्हरफूल कपल जय भानुशाली आणि माही विज यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. दोघांचं नातं सध्या कठीण काळातून जात आहे आणि ते लवकरच वेगळे होण्याचा विचार करत आहेत… असा दावा देखील केला जात आहे. सुरु असणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर माही हिने मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र माही हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत, माहीने रंगणाऱ्या सर्व चर्चा फक्त अफवा आहेत… असं स्पष्ट केलं. माही म्हणाली, ‘जर असं काही असेल तरी मी तुम्हाला का सांगू? तुम्ही माझे काका आहात? तुम्ही माझ्या वकीलाचे पैसे देणार आहात? कोणाच्या घटस्फोटाच्या विभक्त होणाऱ्या चर्चा का सुरु असतात. मी कमेंट सेक्शनमध्ये पाहिलं अनेकांनी जय याला दोष दिलाय. तर अनेकांनी माझ्यावर बोट ठेवला आहे. त्यांना फक्त कोणाला तरी ब्लेम करायचं आहे. तुम्हा लोकांना सत्य काय आहे माहिती आहे… ‘
पुढे माही म्हणाली, ‘सिंगल मदर आणि घटस्फोटाला फार वेगळ्या पद्धतील पाहिलं जातं. लोकांना वाटतं आता मोठा तमाशा होणार आहे. मोठं प्रकरण होणार आहे. लोकं फक्त एकमेकांवर चिखलफेक करतात. मला वाटतं समाजाचा लोकांवर खूप दबाव आहे. तुम्ही जगा आणि जगू द्या.” असं देखील माही म्हणाली.
15 वर्षांपूर्वी झालं होतं लग्न
माही वीज आणि जय भानुशाली यांचं 2010 मध्ये लग्न झालं होतं. माही आणि जय यांना तीन मुलं देखील आहेत. तारा, खुशी आणि राजवीर… नुकताच, जय भानुशालीने सांगितलं की, जेव्हा जय आणि माही मूल होण्याचा विचार करत होते तेव्हा त्यांचं एकमत नव्हते. लग्नानंतर लगेचच माहीने आयव्हीएफसाठी प्रयत्न सुरू केले होते, परंतु जयला त्यावेळी वेळ हवा होता.
आज जय आणि माही त्यांच्या मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. जय – माही यांनी खुशी आणि राजवीर यांना दत्तक घेतलं आहे. तर तारा हिला माही हिने जन्म दिला आहे. माही आणि जय कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. एवढंच नाही तर, दोघे एकमेकांना कपल गोल्स देखील देत असतात. सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत दोघे प्रेम व्यक्त करताना दिसतात.