Shefali Jariwala Death: म्हणून झालं शेफालीचं निधन? तुम्ही ‘ही’ चूक करताय? आजच व्हा सावध… डॉक्टर सांगितलं मोठं कारण
Shefali Jariwala Death: 'त्या' एका चुकीमुळे शेफालीने घेतला वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास, तुम्हीही अशी चूक करत असाल तर आजच व्हा सावधान... डॉक्टरांनी दिला मोठा इशारा..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शेफाली जरीवाला हिची चर्चा...

Shefali Jariwala Death: ‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवाला हिने वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शेफालीच्या निधनानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. एवढंच नाही तर, आरोग्या तज्ज्ञांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. वायाच्या 42 व्या कांटा गला गर्लच्या निधनाचं कारण तिचे उनकी एंटी-एजिंग औषधं असल्याचं सांगितलं जात आहे. पण दुसरी एक मोठी चूक अभिनेत्रीकडून झाली. ज्यामुळे शेफालीचं निधन झालं असं देखील सांगण्यात येत आहे. शेफाली हिने घरात पूजा ठेवली होती. ज्यामुळे अभिनेत्रीने उपवास देखील ठेवलेला. तेव्हा काहीही न खाता अभिनेत्रीने एंटी-एजिंग गोळ्या घेतल्या होत्या. ज्यामुळे अभिनेत्रीची प्रकृती खालावली. काहीही न खाता किंवा न पिता औषधांचा जास्त डोस घेतल्याने रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो. शेफालीच्या बाबतीतही असेच काहीसं घडलं असेल अशी शक्यता डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे.
रिकाम्या पोटी औषधे घेण्याच्या दुष्परिणामांबद्दल, दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिन लीड कन्सल्टंट डॉ. नरेंद्र सिंगला यांनी रिकाम्या पोटी औषधे का घेऊ नयेत हे स्पष्ट केलं. डॉक्टर म्हणाले, जेव्हा औषधं रिकाम्या पोटी घेतली जातात तेव्हा ती खूप लवकर शोषली जातात. याचा शरीरावर अचानक आणि अनपेक्षित परिणाम होऊ शकतो. जलद शोषणामुळे, रक्तदाब, हृदयाचे ठोके आणि रक्तातील साखरेच्या पातळीत जलद चढउतार होऊ शकतात.
सांगायचं झालं तर, काही वृद्धत्वविरोधी औषधं, जसं की ग्लूटाथिओन आणि व्हिटॅमिन सी इंजेक्शन्स, अन्नाशिवाय घेतल्यास रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो, ज्यामुळे बेशुद्धी, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
अन्न खाल्ल्याने कसा होतो फायदा?
जेवणानंतर काही औषधे घेतल्याने दुष्परिणाम कमी होण्यास, त्यांचे शोषण सुधारण्यास किंवा शरीराला औषध अधिक प्रभावीपणे प्रक्रिया करण्यास मदत होऊ शकते. पण, काही औषधे रिकाम्या पोटी घेणं चांगले. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्ययला हवीत. तुम्ही देखील रिकाम्या पोटी कोणती औषधं घेत असाल तर आजच सावधान व्हा… नाहीतर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. काहीही झालं औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
शेफालीच्या निधनानंतर काय झालं?
शेफालीच्या निधनानंतर अभिनेत्रीचं निधन कार्डियक अरेस्टमुळे झालं असं सांगण्यात आलं. अभिनेत्रीने रिकाम्या पोटी एंटी-एजिंग गोळ्या घेतल्या होत्या… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफालीने घरी सत्य – नारायणाची पूजा ठेवली होती. ज्यामुळे तिने काहीही खाल्लं नव्हतं आणि रिकाम्या पोटी एंटी-एजिंग गोळ्या घेतल्या. ज्यामुळे अभिनेत्रीचा रक्तदाब कमी झाला आणि ती बेशुद्ध पडली. अभिनेत्रीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी शेफालीला मृत घोषित केलं.
