मोहम्मद शमी किती श्रीमंत, घटस्फोटानंतर हसीन जहाँला देणार इतके कोटी!
Mohammed Shami Divorce: हसीन जहाँ सोबत घटस्फोट मोहम्मद शमी पडणार महागात, पोटगी स्वरूपात कोट्यवधी, तर पूर्व पत्नी आणि मुलीसाठी महिन्याला मोजावी लागेल मोठी रक्कम..., सध्या सर्वत्र चर्चांना उधाण...

Mohammed Shami Divorce: भारतीय क्रिकेटचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी फक्त त्याच्या मैदानावरील दमदार कामगिरीमुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. पूर्व पत्नी हसीन जहाँ सोबत घटस्फोट प्रकरणी शमी याला मोठा धक्का लागला आहे. आता मोहम्मद शमी याला प्रत्येक महिन्याला हसीन जहाँला तब्बल 4 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. शिवाय शमी याला लेकीच्या महिन्याच्या खर्चासाठी देखील लाखो रुपये द्यावे लागणार आहेत. घटस्फोटानंतर मुलगी आणि पूर्व पत्नीला कोट्यवधी रुपये देणारा मोहम्मद शमी याच्याकडे किती संपत्ती आहे जाणून घेऊ…
मोहम्मद शमी भारतीय क्रिकेटतील दमदार आणि अव्वल खेळाडूंपैकी एक आहे. एवढंच नाहीतर, त्याच्या कमाईचा आकडा देखील फार मोठा आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या वेग आणि स्विंगने फलंदाजांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या शमीला त्याचे चाहते प्रेमाने ‘लाला’ असं देखील म्हणतात.
किती श्रीमंत आहे शमी?
2025 पर्यंत मोहम्मद शमी याची एकून संपत्ती 55 ते 65 कोटी असल्याची माहिती समोर येत आहे. ही संपत्ती क्रिकेटच्या माध्यमातून मिळणारं वेतन, आयपीएल कॉन्ट्रॅक्ट्स आणि ब्रँड एंडोर्समेंट्सद्वारे होते. शमी एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी लाखो रुपये मानधन घेतो.
बीसीसीआयकडून होणारं उत्पन्न
मोहम्मद शमी सध्या बीसीसीआयच्या ग्रेड ए कराराखाली आहे, ज्या अंतर्गत त्याला वार्षिक रिटेनर फी 5 कोटी रुपये मिळते. याशिवाय, सामने खेळण्यासाठी त्याला मिळणारे शुल्क देखील त्याच्या कमाईत भर घालते. टेस्ट मॅच खेळण्यासाठी बीसीसीआय शमी याला प्रति मॅच 15 लाख, वनडे इंटरनॅशलसाठी 6 लाख प्रति मॅच, टी20 इंटरनॅशलसाठी 3 लाख प्रति मॅच पैसे देते. शमी तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने खेळतो, त्यामुळे बीसीसीआयकडून त्याचं वार्षिक उत्पन्न 78 कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.
आयपीएलमधून होणारं उत्पन्न
मोहम्मद शमाच्या उत्पन्नात आयपीएलचा देखील मोठा वाटा आहे. तो आतापर्यंत दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल्स), पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स सारख्या संघांसाठी खेळला आहे. सनरायझर्स हैदराबादने त्याला 2025 च्या आयपीएल हंगामात 10 कोटी रुपयांना विकत घेतलं. शमीची आयपीएल कारकिर्दीतील एकूण कमाई 50 कोटींपेक्षा जास्त झाली आहे, ज्यामुळे तो लीगमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे.
ब्रँड एंडोर्समेंटमुळेही होतं चांगलं उत्पन्न
नायकी (Nike), सीएट टायर्स (CEAT Tyres), एसएस (SS Sareen Sports), ऑक्टाएफएक्स (OctaFX), ब्लिट्जपूल्स (Blitzpools), स्टॅनफोर्ड, प्यूमा (Puma), हेल एनर्जी ड्रिंक (Hell Energy Drink), व्हिजन 11 फँटेसी ऐप (Vision 11) या ब्रँड्सच्याएंडोर्समेंटमुळेही शमी मोठी रक्कम कमावतो. रिपोर्टनुसार, एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी शमी 1 कोटी मानधन घेतो… ज्यामुळे त्यची वर्षाचा कमाई 4 लाख रुपयांपर्यंत पोहोचते.
शमी पूर्व पत्नी किती कोटी देणार?
कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, मोहम्मद शमीला पूर्व पत्नी हसीन जहाँला दरमहा 1 लाख 50 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. तर शमी आणि हसीन यांची एक मुलगी आयरा हिच्या खर्चासाठी देखील क्रिकेटपटूला पैसे द्यावे लागणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शमी याला लेक आयरा हिच्या खर्चासाठी दरमहा 2 लाख 50 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
मोहम्मद शमी आणि हसीन जहां यांच्यातील हे प्रकरण सुमारे 7 वर्ष जुनं आहे. त्यामुळे शमी याला गेल्या सात वर्षांच्या हिशोबाने पैसे मोजावे लागणार आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मोहम्मद शमीला गेल्या सात वर्षांचा खर्चही भरावा लागेल. शमीला त्याच्या पत्नी आणि मुलीला सात वर्षांसाठी 4 लाख रुपये दरमहा या दराने 3 कोटी 36 लाख रुपये द्यावे लागतील असं देखील सांगण्यात येत आहे.
