शाहरुख माझे तळवे चाटत होता आणि…, वादग्रस्त वक्तव्यावर काय म्हणाला आमिर खान?
Aamir Khan And Shah Rukh Khan: आमिरला शाहरुखला म्हणाला 'छिछोरापन', आमिर म्हणालेला , शाहरुख माझे तळवे चाटत होता आणि..., वादग्रस्त वक्तव्यावर आमिर खान याचं धक्कादायक वक्तव्य...

Aamir Khan And Shah Rukh Khan: अभिनेता आमिर खान नुकताच अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं. गेल्या काही वर्षांत त्यांच्या नात्यात अनेक बदल झाले आहे. एकदा तर आमिर खान याने शाहरुख खान याच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शाहरुख माझे तळवे चाटत होता… असं वक्तव्य आमिर खान याने केलं होतं. ज्यामुळे खळबळ माजली होती.
काय म्हणालेला आमिर खान?
2008 मध्ये ब्लॉगमध्ये आमिर खान म्हणाला होता, ‘मी दरीच्या काठावर एका झाडाखाली बसलो आहे. सुमुद्रापासून जवळपास 5000 फीट उंच… आई, आयरा, आणि जुनैद माझ्या बाजूला बसले आहे. आम्ही आमच्या आवडीच्या बोर्ड गेममध्ये व्यस्त होतो. शाहरुख माझे तळवे चाटत होता. मी त्याला बिस्किट भरवत होतो. यापेक्षा मी अधिक काय मागू शकते…’ असं वक्तव्य आमिर खान याने केलं होतं.
त्यानंतर आमिर खान याने वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देखील दिलं. शाहरुख अभिनेत्याच्या कुत्र्याचं नाव आहे. जो आमिर याला घरातील केअरटेकरसोबत भेटला होता. आमिर खान याच्यानुसार, अभिनेत्याने फक्त घर खरेदी केलं नव्हतं तर, घरातील केअरटेकरला देखील हायर केलं होतं.
शाहरुख खान कायम करत असतो विनोद…
आमिर खान म्हणाला होता, शाहरुख खान कायम पुरस्कार सोहळ्यांमध्ये माझ्यावर विनोद करत असतो. प्रत्येक वर्षी पुरस्कार सोहळा असतो. मी जात नाही, पण शाहरुख खान कायम माझ्यावर विनोद करत असतो…
एवढंच नाही तर, ‘आमिर खानचं प्रमेशन ‘छिछोरोपन’ वाटतो..’ असं शाहरुख म्हणालेला. यावर आमिर संयमाने उत्तर देत म्हणाला, ‘शाहरुख खान एक समजदार व्यक्ती आहे. त्याला ‘छिछोरापन’ वाटत असेल तर त्याला मी काहीच करु शकत नाही… एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठी चांगला अनुभव होता.’ असं आमिर म्हणाला होता.
आज कसं आहे आमिर आणि शाहरुख यांचं नातं?
आजच्या घडीला आमिर आणि शाहरुख खान यांचं कौटुंबिक नातं आहे. आमिरने सांगितलं, ‘आम्ही कायम भेटण्यासाठी योजना करत असतो. आम्ही कधीच एका ड्रिंकवर थांबत नाही. सकाळी सात वाजेपर्यंत आम्ही एकत्र असतो. फक्त सलमान खान याच्यासोबत नाही तर, शाहरुख खान याच्यासोबत देखील… असं आतापर्यंत अनेकदा झालं आहे.’ बॉलिवूडचे तीन खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
