वयाच्या 12 व्या वर्षी गमावली व्हर्जिनिटी, खिशात कायम कंडोम, अनेकदा वन नाइट स्टँड, अभिनेत्याचा शॉकिंग खुलासा
Actor Personal Life: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा खासगी आयुष्याबद्दल शॉकिंग खुलासा, कायम खिशात ठेवायचा कंडोम... अभिनेत्याचं वक्तव्य सर्वत्र व्हायरल... सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Actor Personal Life: बॉलिवूडचा एक असा अभिनेता जो कायम स्वतःच्या अतरंगी स्टाईलमुळे आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. अभिनेत्याचे वक्तव्य देखील कायम व्हायरल होत असतात. सध्या अभिनेत्याची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल शॉकिंग खुलासे केले आहे. ऐकल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. तर अभिनेता नक्की कोण आणि त्याने कोणता खुलासा केला याबद्दल जाणून घेऊ.
वयाच्या 12 व्या वर्षी गमावली व्हर्जिनिटी…
सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, बॉलिवूडचा बाजीराव अभिनेता रणवीर सिंग आहे. जबरदस्त एनर्जी आणि दमदार अभिनयासाठी रणवीर सिंग ओळखला जातो. अभिनेत्याने गली बॉय, बाजीराव मस्तानी, पद्मावत, सिम्बा, गोलियों की रासलीला राम-लीला, बेफिक्रे यांसारख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारली आणि चाहत्यांचं मनोरंजन केलं.
एकापेक्षा एक सिनेमे बॉलिवूडला देऊन प्रसिद्धी झोतात आलेला रणवीरने एका मुलाखातीत मोठा खुलासा केलेला. अभिनेत्याने वयाच्या 12 व्या वर्षी एका वयस्कर महिलेकडून स्वतःची व्हर्जिनिटी गमावली. ‘मला असं वाटतं मी प्रत्येक गोष्ट फार लवकर केली आहे. शाळेत असताना माझ्या मित्रांचे पालक म्हणायचे रणवीर एक नासलेलं संफरचंद आहे जो आपल्या मुलांना देखील वाईट मार्गावर घेऊन जात आहे. मी माझ्या आजूबाजूच्या सर्व मुलांना उपदेश करायचो आणि शिकवायचो. त्यांनी त्याबद्दल काहीही ऐकलं नव्हते आणि मी खूप लवकर सुरुवात केल्यामुळे मी तज्ज्ञ झालेलो.’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘मी खिशात कायम कंडोम घेऊन फिरायचो.’ सांगायचं झालं तर, रणवीर सिंगने 2014 मध्ये एका कंडोम ब्रँडच्या जाहिरातीतही काम केलं होतं आणि त्याच्या प्रमोशन दरम्यान रणवीरने त्याचं गुपित उघड केलं होतं. ‘लोकांना स्वतःच्या शारीरिक संबंधांबद्दल मोकळेपणाने बोललं पाहिजे.’ असं रणवीर म्हणाला होता.
एवढंच नाही तर, दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शेमध्ये रणवीरने वन नाईट स्टँडबद्दल देखील सांगितलं होतं. मी अनेकदा वन नाईट स्टँड देखील केलं आहे… असं अभिनेता म्हणाला होता. रणवीर याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना अभिनेत्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं.
अखेर अभिनेत्याने अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर दीपिका आणि रणवीर यांनी गोंडस मुलीचं जगात स्वागत केलं आहे. त्यांच्या मुलीचं नाव दुवा असं आहे. अनेकदा दोघांना लेक दुआ हिच्यासोबत स्पॉट केलं जातं.
