AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदींचा फोन येताच स्मृती ईराणी यांचा मोठा निर्णय, अनेक वर्षांनंतर सत्य समोर

Smriti Irani Says About Her Movies: मालिकांमध्ये सक्रिय असलेल्या स्मृती ईराणी यांना पंतप्रधान मोदींचा फोन, त्यानंत घेतला मोठा निर्णय, अनेक वर्षांनंतर स्मृती ईराणी यांचा मोठा खुलासा

पंतप्रधान मोदींचा फोन येताच स्मृती ईराणी यांचा मोठा निर्णय, अनेक वर्षांनंतर सत्य समोर
फाईल फोटो
| Updated on: Jul 01, 2025 | 9:36 AM
Share

Smriti Irani Says About Her Movies: स्मृती ईराणी असं नाव आहे जे अभिनय विश्व आणि राजकारणात देखील प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्यात स्मृती ईराणी यांनी चाहत्यांच्या मनावर आणि टीव्ही विश्वावर राज्य केलं. अभिनय विश्वात स्वतःच्या कामाचा ठसा उमटवल्यानंतर स्मृती ईराणी यांनी राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला. आता स्मृती ईराणी राजकारणात सक्रिय आहे. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत स्मृती ईराणी यांनी मोठा खुलासा केला आहे.

29 जून रोजी बरखा दत्त यांनी आयोजित केलेल्या ‘वी द वुमन 2015 च्या यूके आवृत्तीच्या उद्घाटन समारंभाला अभिनेत्री आणि राजकारणी स्मृती इराणी उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी स्वतःच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल काही खुलासे केले.

स्मृती ईराणी म्हणाल्या, ‘2014 मध्ये माझा पुन्हा एक करार झाला आणि मी त्यातून बाहेर पडली कारण मला कॅबिनेट मंत्री म्हणून भारतीय संसदेत सेवा करायची होती. तेव्हा माझ्याकडे दोन प्रोजेक्ट होते. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत एका सिनेमा होता आणि ‘क्योंकि सास भी कभी बहू थी…’ पण मला दोन्ही प्रोजेक्टना नकार द्यावा लागला. कारण मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी मला पंधानमंत्री नरेंद्र मोदी कार्यालयातून फोन आलेला…’ असं देखील स्मृती ईराणी म्हणाल्या.

पुन्हा प्रदर्शित होतेय ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिका?

2000 च्या दशकात बरीच लोकप्रिय झालेली एकता कपूरची मालिका ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ काही काळासाठी टेलिव्हिजन पडद्यावर परतणार आहे, ज्यामध्ये स्मृती इराणी आणि अमर उपाध्याय पुन्हा एकदा तुलसी आणि मिहिर यांच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.

स्मृती ईराणी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, राजकारणात येण्यापूर्वी स्मृती ईराणी टीव्ही विश्वात सक्रिय होत्या. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिके शिवाय त्यांनी ‘एक थी नायका’, ‘तीन बहूरानियां’ यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केलं. आता स्मृती ईराणी राजकारणात मोठी भूमिका बजावत देशाची सेवा करत आहेत.

Follow Us
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार