शेफालीने मृत्यूच्या काही तासांपूर्वी केलेलं असं काम, मैत्रिणीकडून मोठं सत्य समोर
Shefali Jariwala Death Update: शेफाली जरीवाला हिच्या मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर, मृत्यूच्या काही तासांपूर्वी शेफाली हिने काय केलं होतं? अभिनेत्रीच्या मैत्रिणीकडून मोठं सत्य अखेर समोर

अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच्या निधनानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. कोणालाच विश्वास होत नाही की, वयाच्या 42 व्या वर्षी शेफाली हिने अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार कांटा लगा गर्ल गेल्या काही दिवसांपासून सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीचं हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. सध्या शेफाली मृत्यू प्रकरणी पोलिसांची कसून चौकशी सुरु असताना अभिनेत्रीच्या जवळच्या मैत्रिणीने मोठा खुलासा केला आहे.
शेफालीने स्किन ट्रीटमेंटची घेतली होती औषधं…
एका मुलाखतीत शेफालीच्या मैत्रिणीने मोठा खुलासा केलाय. शेफालीची मैत्रीण पूजा घाई म्हणाली, ‘त्या दिवशी शेफालीने व्हिटॅमिन सी ड्रीप घेतली होती. पण व्हिटॅमिन सी घेणं ही सामान्य गोष्ट आहे. आम्ही सगळे व्हिटॅमिन सी घेतो. मला असं वाटतं कोरोना महामारीनंतर अनेकांनी व्हिटॅमिन सी घेणं नियमितपणे सुरु केलं आहे. व्हिटॅमिन सी एक अशी गोष्ट आहे, जी मी सुद्धा घेते.’ असं अभिनेत्रीची मैत्रीण म्हणाली आहे.
पोलिसांनी केली औषधांची तपासणी…
पूजा मुलाखतीत म्हणाली, जेव्हा मी त्याठिकाणी उभी होती, तेव्हा पोलिसांना त्या व्यक्तीला बोलावलं ज्याने शेफालीली IV ड्रीप दिली होती. जेणेकरून ती कोणते औषध घेत होती हे निश्चित करता येईल आणि नंतर असं आढळून आलं की तिने आयव्ही ड्रिप घेतली होती.’
पूजा एक महत्त्वाची गोष्ट देखील याठिकाणी स्पष्ट केली. व्हिटॅमिन सी अत्यंत सामान्य गोष्ट आहे. जर तुम्ही दुबईच्या रस्त्यांवर चालत असाल तर, तुम्हाला दिसेल तेथील मेडिकल आणि क्लिनिकमध्ये देखील व्हिटॅमिन सी सहज मिळतात. ती इंडस्ट्रीमध्ये होती आणि तिला स्वतःचं बेस्ट द्यायचं होतं… ती सर्वांत सुंदर दिसायची…
शेफालीच्या घरी झालेली पूजा
मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले जात आहे की 27 जून रोजी शेफालीच्या घरी पूजा होती, तिने उपवास ठेवला होता. तरीही तिने दुपारी वृद्धत्वविरोधी औषधाचं इंजेक्शन घेतलं. एका डॉक्टरने तिला वर्षानुवर्षे ही औषधे घेण्याचा सल्ला दिला होता आणि ती दर महिन्याला त्यावर उपचार घेत होती. रिपोर्टनुसार, शेफाली गेल्या सात ते आठ वर्षांपासून ग्लूटाथिओन आणि व्हिटॅमिन इन्फ्युजनसह वृद्धत्वविरोधी औषधे घेत होती. रात्रीच्या वेळी अभिनेत्रीचा रक्तदाब कमी झाला आणि ती बेशुद्ध पडली असं सांगितले जात आहे. तिला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
