AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 पेक्षा अधिक चित्रपटात केलं काम, पण 13 वर्षांमध्ये दिला एकही हिट, संपत्ती पाहून उडतील होश

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री जिने 13 वर्षांमध्ये दिला नाही एकही हिट चित्रपट. मात्र, संपत्तीमध्ये टॉप अभिनेत्रींना देते टक्कर. नेटवर्थ पाहून थक्क व्हाल.

100 पेक्षा अधिक चित्रपटात केलं काम, पण 13 वर्षांमध्ये दिला एकही हिट, संपत्ती पाहून उडतील होश
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 08, 2026 | 4:11 PM
Share

Bollywood Actress : गेल्या अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर असूनही कोट्यवधींची संपत्ती वाढवत असलेली अभिनेत्री म्हणून जूही चावलाचं नाव आजही आवर्जून घेतलं जातं. साधारणपणे एखादी अभिनेत्री सात–आठ वर्षे थिएटर रिलीजपासून दूर राहिली आणि अनेक वर्षांपासून एकही मोठा हिट चित्रपट दिला नाही तर त्याची कमाई कमी होते. मात्र जूही चावलांच्या बाबतीत ही गोष्ट पूर्णपणे उलटे ठरले. अभिनयापासून काहीशी दूर राहूनही ती आज देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

जवळपास 40 वर्षांपूर्वी1986 साली आलेल्या ‘सल्तनत’ या चित्रपटातून जूही चावलाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मात्र 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कयामत से कयामत तक’ या सुपरहिट चित्रपटाने तिला खरी ओळख मिळवून दिली. आमिर खानसोबत झळकलेल्या या चित्रपटानंतर जूही रातोरात स्टार बनली. यानंतर तिने एकामागोमाग एक हिट चित्रपट दिले आणि हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्वतःचं स्थान पक्कं केलं.

100 हून अधिक चित्रपटांचा प्रवास

जूही चावलाने आतापर्यंत 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हिंदीसोबतच तिने दाक्षिणात्य आणि इतर भाषांमधील चित्रपटांतही भूमिका साकारल्या. 1991 साली ती सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत ‘नातुक्कु ओरु नल्लवन’ या तामिळ चित्रपटातही झळकली होती. कालांतराने तिने मुख्य भूमिका कमी करत कॅमिओ किंवा लहान पण महत्त्वाच्या भूमिका स्वीकारायला सुरुवात केली. त्यामुळे गेल्या सुमारे 13 वर्षांत तिने कोणतीही हिट चित्रपट दिला नाही.

चित्रपटांमधील काम कमी झालं असलं तरी जूही चावलाची लोकप्रियता अजिबात कमी झाली नाही. उलट, तिने अत्यंत दूरदृष्टीने व्यवसाय आणि गुंतवणुकीकडे आपला मोर्चा वळवला. 2024-25 च्या हुरुन रिच लिस्टनुसार जूही चावलाची एकूण संपत्ती सुमारे 4600 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. चित्रपटांमधून येणारी कमाई कमी झाली असली तरी स्मार्ट इन्व्हेस्टमेंटमुळे तिची आर्थिक स्थिती अधिक भक्कम झाली.

IPL, प्रोडक्शन आणि मोठ्या गुंतवणुका

जूही चावला आणि शाहरुख खान यांची मैत्री सर्वश्रुत आहे. दोघे मिळून आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्सचे को-ओनर आहेत. रिपोर्ट्सनुसार या टीममध्ये जूही चावलाची गुंतवणूक सुमारे 623 कोटी रुपये इतकी आहे. फोर्ब्सनुसार, कोलकाता नाइट रायडर्सची सध्याची बाजारमूल्यं सुमारे 9139 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. याशिवाय त्ती शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रोडक्शन कंपनीची देखील को-ओनर आहे. तसेच सौराष्ट्र सिमेंटमध्येही तिची भागीदारी आहे.

Follow Us
शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
Shinde Sena Meeting : शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; संतोष पवारांचा व्हिडिओ....
Sandip Deshpande : Shinde Sena : 50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; शाखाप्रमुख संतोष पवारांचा व्हिडिओ संदीप देशपांडेंकडून व्हायरल
आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्ट बोलले
Satej Patil : आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये..
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये धडक तपासणी
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
Rohit Pawar : NCP : रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले CCTV....
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; नागपूरच्या रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले 20 हून अधिक CCTV कॅमेरे हटवले
व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा..
WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा काय?
घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..; दरेकरांचा रोहित....
Pravin Darekar on Rohit Pawar : घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..;  दरेकरांचा रोहित पवारांना खोचक टोला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?