AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार, सुप्रिया सुळे भाजपचा राजकीय अजेंडा पुढे नेतायत, पण बी-टीम…; अंजली आंबेडकर भडकल्या

Anjali Prakash Ambedkar : अंजली प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. डिलिमिटेशन विधेयकावरील भूमिकेवरून आंबेडकरांनी टीका केली.

शरद पवार, सुप्रिया सुळे भाजपचा राजकीय अजेंडा पुढे नेतायत, पण बी-टीम...; अंजली आंबेडकर भडकल्या
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 24, 2026 | 10:28 AM
Share

मोदी सरकार आगामी हिवाळी अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण सुधारणा विधेयक सादर करण्याच्या तयारीत आहे. या विधेयकाला शरद पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी सुप्रिया सुळे यांनी देखील डिलिमिटेशन विधेयक हाती आल्यानंतर भूमिका स्पष्ट करू, असे जाहीर केले. इंडिया आघाडीतील काँग्रेस पक्ष उघडपणे डिलिमिटेशन विधेयकाला करताना दिसत आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेने संभ्रम निर्माण झाला आहे. शरद पवार गटाच्या भूमिकेवरून वंचित बहुजन आघाडीच्या अंजली प्रकाश आंबेडकर यांनी एकच संताप व्यक्त केला आहे.

अंजली आंबेडकर यांची पोस्ट जशीच्या तशी 

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या अलीकडील निर्णयावर टीका करणारे खुले पत्र किती स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी लिहिले? निर्भय बनोच्या किती लोकांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना भाजपची बी-टीम म्हटले? वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवते म्हणून तिला भाजपची बी-टीम ठरवण्यासाठी उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि निर्भय बनोचे लोक नेहमीच तत्पर असतात. मात्र, शरद पवार आणि सुप्रिया सुळे जेव्हा उघडपणे भाजपला राजकीय मदत करतात. तेव्हा अचानक त्यांचे आवाज बंद होतात. 2024 च्या निवडणुकीत प्रबळ जातींच्या राजकीय पक्षांसाठी या उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि निर्भय बनोच्या लोकांनी जोरदार प्रचार केला. त्या पक्षांना प्रश्न विचारण्याची वेळ येते तेव्हा मात्र ते जाणीवपूर्वक गप्प बसतात.हा बौद्धिक विसंगतीचा प्रश्न नाही, तर राजकीय सोय आणि जातीवर आधारित ‘निवडक संताप’ दाखवणारी कृती आहे. यांच्या राजकीय नैतिकतेत एक विचित्र दुटप्पीपणा दिसून येतो.

बहुजनांच्या राजकीय अस्मितेवर आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्वतंत्र राजकीय अस्तित्वावर ते सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मात्र, ज्या सवर्ण राजकीय पक्षांच्या कृती भाजपचा सामाजिक आणि राजकीय अजेंडा अधिक मजबूत करत आहेत. त्यांच्याबाबत मात्र कमालीची उदार भूमिका घेतात.भाजपने प्रस्तावित केलेले डिलिमिटेशन विधेयकाला हे SIR पेक्षाही अधिक धोकादायक आहे. या डिलिमिटेशन विधेयकामुळे उत्तर भारतातील राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व असमान प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भारताच्या संघराज्यीय समतोलाला मूलभूत धक्का बसू शकतो. एका विशिष्ट प्रादेशिक गटाच्या हातात राजकीय सत्ता केंद्रित होऊ शकते आणि संघराज्य व्यवस्थेतील समान प्रतिनिधित्वाच्या लोकशाही तत्त्वाला बाधा पोहोचू शकते. हा काही केवळ संसदेतील तांत्रिक प्रक्रियेचा विषय नाही. हा भारताच्या लोकशाहीच्या भविष्याशी संबंधित प्रश्न आहे.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेणाऱ्या आणि भारताच्या लोकशाही व संघराज्यीय पायाभूत रचनेला कमकुवत करणाऱ्या राजकीय प्रक्रियेला मदत करत आहेत, ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही.  मात्र, प्रश्न असा आहे की, उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि निर्भय बनोच्या लोकांनी मौन का बाळगले आहे? वंचित बहुजन आघाडी केवळ स्वतंत्रपणे निवडणूक लढवते म्हणून ती आपोआप भाजपची बी-टीम ठरते; मग शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपच्या राजकीय अजेंड्याला मदत करतात आणि त्याला वैधता मिळवून देतात, तेव्हा त्यांना भाजपची बी-टीम का म्हटले जात नाही? तुमचे हे मौन तुमचा संताप हा केवळ राजकीय सोय आणि जातीवर आधारित आहे. यातून तुमचा बौद्धिक अप्रामाणिकपणा आणि बहुजन राजकीय पक्षांविषयी असलेला द्वेष उघड होतो. तुम्ही सर्वजण विकले गेलेले आहात असे भाजप ला पोटतिडीकीने विरोध करणाऱ्या फुले आंबेडकरी कार्यकर्त्यांनी गृहीत धरावे का?

Follow Us
शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
Shinde Sena Meeting : शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; संतोष पवारांचा व्हिडिओ....
Sandip Deshpande : Shinde Sena : 50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; शाखाप्रमुख संतोष पवारांचा व्हिडिओ संदीप देशपांडेंकडून व्हायरल
आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्ट बोलले
Satej Patil : आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये..
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये धडक तपासणी
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
Rohit Pawar : NCP : रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले CCTV....
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; नागपूरच्या रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले 20 हून अधिक CCTV कॅमेरे हटवले
व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा..
WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा काय?
घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..; दरेकरांचा रोहित....
Pravin Darekar on Rohit Pawar : घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..;  दरेकरांचा रोहित पवारांना खोचक टोला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?