Health Tips: वजन वाढल्यानंतर खरंच आवाजात बदल होतो, यावर काय म्हणतात कान – नाक – घसा तज्ज्ञ?
Health Tips: वजन वाढल्यानंतर आवाजात फरक पडतो का? असा प्रश्न अनेकांना पडतो. सांगायचं झालं तर, वजन वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. पण आवाजात बदल होतो की, नाही याबद्दल कोणाला काहीच कळत नाही. तर या समस्यावर कान - नाक - घसा तज्ज्ञ मोठा सल्ला दिला आहे.

Health Tips: आजत्या धकाधकीत्या जीवनात अनेकांचं काम बसल्या जागी आहे. 9 ते 5 च्या जॉबमध्ये अनेकांना दुपारचं जेवण करण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. अशात अनेक समस्या डोकं वर काढतात, त्यामधील सर्वात गंभीर समस्या म्हणजे सतत वाढणारं वजन. सर्वात महत्त्वाची एक गोष्ट जाणून घ्या आणि की म्हणजे, शरीराचं वजन वाढल्यास फक्त कपड्यांचा आकार बदलत नाही तर, आरोग्यातही अनेक बदल होत असता. वजन वाढल्याने आवाजातही बदल होऊ शकतो…. हे सत्य फार कोणाला माहिती नाही. लठ्ठपणा आणि शरीरातील वाढलेल्या चरबीमुळे काही लोकांच्या आवाजाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.
कैलाश दीपक हॉस्पिटलमधील ईएनटी तज्ज्ञ डॉ. अंशुल चथारत यांच्या मते, जेव्हा शरीराचं वजन वाढतं, तेव्हा घसा आणि मानेभोवती चरबी जमा होऊ शकते. यामुळे श्वसनमार्गावर दाब पडण्याची शक्यता असते. परिणामी, काही लोकांचा आवाज पूर्वीपेक्षा जड वाटू शकतो.
वजन वाढल्यावर आवाजात बदल का होतो?
जेव्हा शरीराचं वजन वाढत असतं, तेव्हा घशाभोवतीच्या ऊतींमध्ये बदल होऊ शकतात. याचा परिणाम आवाजाच्या उच्चारणावर आणि गुणवत्तेवर होऊ शकतो. याव्यतिरिक्त, जास्त वजन असलेल्या लोकांना ॲसिड रिफ्लक्स त्रास होण्याची शक्यताही जास्त असते. जेव्हा पोटातील आम्ल घशात परत येते, तेव्हा त्यामुळे स्वरयंत्राला दाह किंवा सूज येऊ शकते. कधीकधी, स्वरयंत्रावर व्रण, गाठी किंवा पॉलिप्ससारखे बदल दिसू शकतात. यामुळे बोलताना आवाज घोगरा, जड होऊ शकतो किंवा बदलू शकतो.
घोरणे आणि झोपेच्या समस्या देखील एक घटक आहेत का?
काही लठ्ठ लोकांना स्लीप ॲप्नियाचा धोका जास्त असतो. यामुळे झोपेत श्वास घेण्यास अडथळा आल्याने मोठ्याने घोरणे आणि तोंड उघडे ठेवून झोपणे होऊ शकते. यामुळे घसा कोरडा पडणे, सकाळी उठल्यावर आवाज बसणे आणि जास्त वेळ बोलल्यावर घशात वेदना किंवा जळजळ होऊ शकते. काही लोकांना घशात काहीतरी अडकल्यासारखेही वाटू शकते.
आवाजात बदल झाल्यास काय करावे?
जर तुमचा आवाज वारंवार बदलत असेल किंवा बोलताना घशात वेदना आणि जळजळ जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कान, नाक, घसा तज्ञांचा सल्ला घेणं आणि तपासणी करून घेणं उत्तम राहील. वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे, विशेषतः जर आवाजातील बदल तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिला तर. शरीराचे निरोगी वजन राखणे, संतुलित आहार घेणे आणि नियमित व्यायाम करणे हे सर्वांगीण आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
