AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीरिज असावी तर अशी.. ओटीटीवर येताच मारली बाजी; नंबर 1 वर होतेय ट्रेंड

ही बहुप्रतिक्षित वेब सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली असून, अवघ्या तीन दिवसांत ट्रेंडिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. आठ भागांच्या या सीरिजमध्ये अभिनेत्याने तब्बल नऊ भूमिका साकारल्या आहेत.

| Updated on: Nov 24, 2026 | 10:16 AM
Share
ओटीटी विश्वात सध्या एका वेब सीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेता भुवन बाम याची बहुप्रतिक्षित कॉमेडी ड्रामा सीरिज 'ढिंढोरा 2' नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित जाली आहे. प्रेक्षकांकडून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, रिलीज झाल्यानंतर अवघ्या 3 दिवसांत ही सीरिज नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. 20 नोव्हेंबर 2026 रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.

1 / 7
पहिल्या सिझनला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर दुसऱ्या सिझनची प्रेक्षक गेल्या पाच वर्षांपासून प्रतीक्षा करत होते. आता ही प्रतीक्षा संपली असून आठ एपिसोड्सची ही सीरिज प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देत आहे. 'ढिंढोरा 2'ची कथा टीटू मामा आणि त्याच्या कुटुंबाभोवती फिरते. पहिल्या सिझनमधील लॉटरीच्या कथेनंतर आता टीटू मामाच्या आयुष्यात नवं संकट उभं राहिलं आहे. तब्बल 11 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्यामुळे तो अडचणीत सापडला आहे. त्यातच पत्नी कविता आणि तिच्या माहेरच्या मंडळींसोबतचे संबंध सुधारण्याचीही जबाबदारी त्याच्यावर आहे.

2 / 7
यासाठी टीटू गावात परततो. मात्र नातेसंबंध सुधारण्याच्या प्रयत्नात त्याच्या आयुष्यात आणखी गोंधळ निर्माण होतो. कविताचा जुना प्रियकर आणि टीटू मामाचा मित्र ते शत्रू बनलेला विषधर याच्या एन्ट्रीमुळे कथेत नवे ट्विस्ट पाहायला मिळतात. कौटुंबिक नातेसंबंध, पैशांची अडचण आणि विनोदी प्रसंग यांची सांगड या सीरिजमध्ये घालण्यात आली आहे.

3 / 7
या सीरिजचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे भुवन बामचा अभिनय. त्याने यामध्ये तब्बल नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. टीटू मामा, बबलूजी, जानकी, समीर आणि बंचो यांसारख्या व्यक्तिरेखांमधून त्याने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. प्रत्येक पात्राची बोलण्याची पद्धत, देहबोली आणि स्वभाव वेगळा असल्याने प्रेक्षकांना त्याचा अभिनय पाहायला आवडत आहे.

4 / 7
याशिवाय अभिनेत्री संजीदा शेखने कविता मामीची भूमिका साकारली आहे. कंवलजीत सिंह, हेमंत पांडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसंच अनूप सोनी, उदित नारायण आणि ओरी यांच्या स्पेशल अपिअरन्समुळे सीरिजमध्ये आणखी रंगत आली आहे. या सीरिजचं दिग्दर्शन स्नेहा शेट्टी कोहली यांनी केलं आहे.

5 / 7
'ढिंढोरा 2' मध्ये कॉमेडी, कौटुंबिक ड्रामा, रोमँटिक प्रसंग आणि सामाजिक विषय यांचा समावेश करण्यात आला आहे. काही विनोदी प्रसंग खळखळून हसवतात, तर काही ठिकाणी कथानक थोडं रेंगाळतं. पहिल्या सिझनमधील पात्रांशी आधीपासून ओळख असलेल्या प्रेक्षकांना दुसरा सिझन अधिक आवडू शकतो. मात्र, काही विनोद आणि संवाद फारसे नवीन वाटत नसल्याची टीकाही झाली आहे.

6 / 7
एकूणच, भुवन बामच्या चाहत्यांसाठी ही सीरिज मनोरंजनाचा चांगला पर्याय ठरू शकते. विशेष म्हणजे, पाच वर्षांनंतर टीटू मामाला पुन्हा पाहण्याची संधी मिळाल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. ही आठ भागांची सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. त्यामुळे या वीकेंडला काहीतरी हलकंफुलकं आणि विनोदी पाहायचं असेल, तर 'ढिंढोरा 2' हा पर्याय नक्की विचारात घेता येईल.

7 / 7
Follow Us
50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; संतोष पवारांचा व्हिडिओ....
Sandip Deshpande : Shinde Sena : 50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; शाखाप्रमुख संतोष पवारांचा व्हिडिओ संदीप देशपांडेंकडून व्हायरल
आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्ट बोलले
Satej Patil : आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये..
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये धडक तपासणी
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
Rohit Pawar : NCP : रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले CCTV....
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; नागपूरच्या रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले 20 हून अधिक CCTV कॅमेरे हटवले
व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा..
WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा काय?
घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..; दरेकरांचा रोहित....
Pravin Darekar on Rohit Pawar : घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..;  दरेकरांचा रोहित पवारांना खोचक टोला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा