AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय, साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन होणार, 13 सदस्यांची समिती स्थापन

महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी फडणवीस सरकारने 13 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती कारखान्यांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करून त्यांना सक्षम बनवण्यासाठी उपाययोजना सुचवेल. आधुनिक तंत्रज्ञान आणि उपपदार्थ निर्मितीवर भर देत, दोन महिन्यांत अहवाल सादर करणार आहे.

फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय, साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन होणार, 13 सदस्यांची समिती स्थापन
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2026 | 9:49 AM
Share

महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सहकारी साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी फडणवीस सरकारने समिती गठीत केली आहे. राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू राहावेत, यासाठी सहकार विभाग आणि राज्य सहकारी बँकेकडून संयुक्त अभ्यास करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील सहकारी साखर कारखाने कात टाकणार असून नव्या जोमाने उभे राहणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारी साखर कारखान्याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. सहकारी साखर कारखाने पुनरुज्जीवीत करण्यासाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यीय समिती स्थापन करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची सद्यस्थिती, आर्थिक अडचणी आणि कारखाने बंद पडण्यामागील कारणांचा ही समिती सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल राज्य सरकारला देणार आहे.

आर्थिक सक्षमीकरणावर भर

समितीमध्ये सहकार आयुक्त, राज्य सहकारी बँक, रिझर्व्ह बँक, नाबार्ड, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तसेच सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. कारखान्यांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देण्यासाठीच ही समिती स्थापन करण्यात आली आहे. ऊस उत्पादकता आणि साखर उतारा वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतच्या शिफारशी या समितीकडून अपेक्षित आहेत.

दोन महिन्यात अहवाल

ऊस शेतीमध्ये एआय, जीपीएस, ड्रोन आणि ठिबक सिंचनाचा वापर वाढवण्यावर भर, ऊस बियाणे, मृदा आरोग्य, पीक फेरपालट आणि ऊस विकास कार्यक्रमाचा अभ्यास, साखर कारखान्यांना ऊर्जा संकुल म्हणून विकसित करण्यासाठी आराखडा आदी गोष्टींचा अभ्यास ही समिती करणार आहे. तसेच या समितीला दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समितीने दोन महिन्यांच्या आत सविस्तर अहवाल आणि शिफारशी शासनाला सादर कराव्यात, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

काय अभ्यास होणार?

– साखर उद्योगातून अतिरिक्त उत्पन्नाचे नवे पर्याय

– सीबीजी, इथेनॉल, मल्टी-फीड डिस्टिलरी, शाश्वत विमान इंधन निर्मितीला प्रोत्साहन

– सहवीज निर्मिती, सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि जैव-रसायन निर्मितीवर भर

– 10 उपपदार्थांच्या निर्मितीसाठी एकात्मिक बायो-रिफायनरी अर्थात झिरो वेस्ट मॉडेल तयार करण्याचा विचार

– यासाठी केंद्र सरकार 20 टक्के, राज्य सरकार 10 टक्के आणि कारखान्यांचा 70 टक्के आर्थिक सहभाग या प्रस्तावित आर्थिक प्रारूपाची व्यवहार्यता तपासली जाणार

– अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना पुनरुज्जीवनाचा आधार

– प्रत्येक कारखान्याची स्वतंत्र आर्थिक व्यवहार्यता तपासली जाणार

– हंगामनिहाय स्वतंत्र कॅश क्रेडिट कर्ज खाते आणि कर्ज परतफेडीचे धोरण निश्चित होणार

– आर्थिक अडचणीत असलेल्या एनपीए कारखान्यांसाठी रिझर्व्ह बँकेच्या मदतीने पुनरुज्जीवन आणि कर्जनिराकरण आराखडा तयार होणार

– बाह्य गुंतवणूकदारांचा सहभाग, पुनरुज्जीवन निधी आणि एनसीडीसीमार्फत भांडवली सहाय्याबाबत धोरण निश्चित करण्याचा अभ्यास

Follow Us
आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्ट बोलले
Satej Patil : आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये..
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये धडक तपासणी
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
Rohit Pawar : NCP : रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले CCTV....
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; नागपूरच्या रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले 20 हून अधिक CCTV कॅमेरे हटवले
व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा..
WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा काय?
घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..; दरेकरांचा रोहित....
Pravin Darekar on Rohit Pawar : घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..;  दरेकरांचा रोहित पवारांना खोचक टोला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल