एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याची गंभीर आजारावर मात
Navra Maza Navsacha: 'नवरा माझा नवसाचा' फेम अभिनेत्याची गंभीर आजारावर मात, तब्बल 6 वर्षांनंतर केली नव्याने आयुष्याला सुरुवात, एकनाथ शिंदे यांनी केली मोठी मदत, अनेक वर्षांनंतर अभिनेता म्हणाला...

‘नवरा माझा नवसाचा’ सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. चाहते आजही सिनेमा तितक्यात आवडीने पाहतात. सिनेमातील कलाकार आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. विनोदावर आधारलेल्या सिनेमाने एक काळ गाजवला. गणपतीपुळे बस प्रवासादरम्यान झालेल्या गमतीमुळे सिनेमाने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केला. अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर यांनी सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली. बस प्रवासात ऑनस्क्रिन बायकोसोबत प्रवास करणारा अभिनेता विकास समुद्रे याने देखील चाहत्यांचं मन जिंकलं. पण गेल्या काही वर्षांपासून विकास अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.
एका गंभीर आराजाशी झुंज लढत असल्यामुळे विकास झगमगत्या विश्वापासून दूर होता. मिळालेल्या माहितीनुसार, विकास याला ब्रेन हॅमरेज सारख्या गंभीर आजाराने ग्रासलं होतं. 2018 मध्ये अभिनेत्याला आजाराचं निदान झालं. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे उपचारांसाठी पैशांची चणचण देखील अभिनेत्याला भासत होती.
आयुष्यातील कठीण काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास याची मोठी मदत केली. आता विकास याने आजारावर मात केली असून पुन्हा चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. विकास याने ‘सुंदरा मनात भरली’ या नाटकातून दुहेरी भूमिका साकारत इंडस्ट्रीमध्ये दमदार पदार्पण केले.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विकास याने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आजारपणाचा काळ कठीण असल्यामुळे अनेक गोष्टींना मुकलो… गेली 22 वर्ष प्रेक्षकांना भरभरुन प्रेम दिल… त्यांच्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे पुन्हा उभा राहत आहे…’ असं देखील अभिनेता म्हणाला.
विकास समुद्रे याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने मराठीतील अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकांमध्येही कामं केली आहेत. विनोदी अभिनेता म्हणून मराठी मनोरंजनसृष्टीत विकास सुप्रसिद्ध आहे. लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘फू बाई फू’मधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली होती.
नवरा माझा नवसाचा सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमातील कलाकार आणि अनेक सीनचे लहान व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय सिनेमातील डायलॉग आजही चाहते रोजच्या जीवनात वापरत असतात. सिनेमा 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमात . अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर यांच्यासोबत सुनील तावडे, प्रदीप पटवर्धन, माधुराणी प्रभुलकर, विजय पाटकर, जॉनी लिव्हर, सोनू निगम, रिमा लागू, कुलदीप पवार यांनी दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
