AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई निवडणुकीला उभी आहे, सराफाला सांगितलं… त्यानंतर जे घडलं त्याने डोंबिवली हादरली

डोंबिवलीमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात एका तरुणाने आई निवडणुकीला उभी आहे सांगत नकली सोने गहाण ठेवले. त्यावर त्याने 28 लाख रुपये घेतले. पण नंतर जे सत्य समोर आले ते ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल.

आई निवडणुकीला उभी आहे, सराफाला सांगितलं... त्यानंतर जे घडलं त्याने डोंबिवली हादरली
Dombivli CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 08, 2026 | 12:39 PM
Share

आई निवडणुकीला उभी असल्याचं कारण सांगत डोंबिवलीतील एका सराफाला तब्बल 28 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापूर येथील तरुणाने बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून ही फसवणूक केल्याचा आरोप असून, या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षात अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने सराफांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

डोंबिवली पूर्वेतील जुनी डोंबिवली, खंडोबा मंदिर परिसरात राहणारे तरुण पोरिया हे ‘राधे गोल्ड आर्ट्स’ या नावाने सोने-चांदी विक्री आणि ऐवज तारण ठेवण्याचा व्यवसाय करतात. याच व्यवसायाचा गैरफायदा घेत बदलापूर येथील प्रवीण पाटील या तरुणाने तब्बल 28 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नेमकं काय घडलं?

तक्रारीनुसार, डिसेंबर महिन्यात प्रवीण पाटील हा तरुण पोरिया यांच्या दुकानात आला. “माझी आई पालिका निवडणुकीला उभी आहे, तातडीने पैशांची गरज आहे,” असे सांगत त्याने सोने तारण ठेवून पैसे देण्याची मागणी केली. सुरुवातीला 14 ग्रॅम वजनाची सोनसाखळी तारण ठेवून 1 लाख 10 हजार रुपये घेतल्यानंतर त्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रवीण पाटील याने ब्रेसलेट, सोनसाखळ्या असा एकूण 281 ग्रॅम वजनाचा, सुमारे 28 लाख रुपयांचा ऐवज तारण ठेवला. या व्यवहारात प्रवीणसोबत राहुल रुपेश चव्हाण हाही उपस्थित होता.

पोलिसांत तक्रार, तपास सुरू

पाटील याने “निवडणूक झाल्यानंतर पंधरा दिवसांत सोने सोडवून पैसे परत करतो,” असे आश्वासन दिले होते.मात्र संशय आल्याने तरुण पोरिया यांनी सदर दागिने डोंबिवली पूर्वेतील आगरकर रस्त्यावरील दुकानात तपासणीसाठी दिले. तपासणीत सोन्याची शुद्धता केवळ 0.302 टक्के आणि 0.072 कॅरेट आढळून आल्याने हे दागिने बनावट असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुण पोरिया यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

परिसरात भीतीचे वातावरण

पोलीस पुढील तपास करत असून, गेल्या दोन वर्षात कल्याण-डोंबिवली परिसरात अशाच पद्धतीने अनेक सराफांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी अशा फसवणुकीच्या प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, सराफ व्यावसायिकांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची तात्काळ शुद्धता तपासणी करावी, असे आवाहन केले आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार