AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! सुनेत्रा पवारच विलिनीकरणाला तयार नाहीत? राष्ट्रवादीत काय घडतंय?

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. सुनेत्रा पवारच विलिनीकरणास तयार नाहीत. पक्षावरील नियंत्रण सुटण्याच्या भीतीमुळे त्या या निर्णयाच्या विरोधात आहेत. यामुळे विलिनीकरणाची प्रक्रिया थांबली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सर्वात मोठी बातमी ! सुनेत्रा पवारच विलिनीकरणाला तयार नाहीत? राष्ट्रवादीत काय घडतंय?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 11, 2026 | 12:36 PM
Share

गेल्या आठवड्याभरापासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या विषयाला हवा दिल्यानंतर या विषयाला फोडणी मिळाली आहे. त्यातच अजितदादा गटाचे आमदार आज शरद पवार यांची भेट घेणार असल्याने विलिनीकरणाच्या चर्चांनी आणखीनच जोर धरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर आली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला तयार नसल्याचं समोर आलं आहे. सुनेत्रा पवार यांना पक्षावरील आपलं नियंत्रण घालवायचं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचं विलिनीकरण अडलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची धुरा आली. पण आता पुन्हा एकदा आपला पक्ष आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी आणि पक्षाची एकजूट कायम ठेवण्यासाठी शरद पवार सक्रिय झाल्याचं सांगितलं जात आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपला संसदेत आपली स्थिती भक्कम करायची आहे. तसेच विरोधकांना कमकुवत करायचं आहे. त्यासाठी भाजपला शरद पवार आणि त्यांच्या लोकसभा खासदारांचं समर्थन हवं आहे. अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी दीड तास चर्चा केली. त्यानंतर पवार आणि पटेल यांची पुन्हा भेट होणार असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

भाजपचाच आग्रह

सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे विलिनीकरणाच्या विरोधात आहेत. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एनसीपीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्यांना विलिनीकरणाची प्रक्रिया अधिक वेगाने पुढे नेण्याचा आग्रह धरला आहे. या बैठकीपासून सुनेत्रा पवारांना दूर ठेवण्यात आलं होतं. त्यावरून भाजप आपली ही योजना पुढे नेण्यासाठी एनसीपीच्या वरिष्ठ नेत्यांनाच पुढे करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. या भेटीनंतरच एनसीपीच्या नेत्यांच्या वागण्याबोलण्यात फरक पडला आहे, असं ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तात म्हटलं आहे.

पवार विचारधारा सोडून येतील?

विलिनीकरण झालं तर पक्षावरील आपलं नियंत्रण निघून जाईल याची सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना चिंता आहे. त्यामुळेच त्यांनी शरद पवार आपली धर्मनिरपेक्ष विचारधारा सोडून मोदी आणि शाहांच्या नेतृत्त्वात काम करण्यास तयार होतील का? असा सवाल केला आहे. दरम्यान, शरद पवार यांनी आपले पर्याय खुले ठेवले असल्याचंही सांगण्यात येत असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

भाजपला शुभेच्छा

शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना महत्त्वाची जबाबदारी द्यायची आहे. त्यांना सेट करायचं आहे. तसेच एनसीपीची जी कायदेशीर लढाई सुरू आहे, ती लढाई आपणच जिंकू, असा पवारांना विश्वास आहे. या सर्व घडामोडींवर शरद पवार गटाच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. पवार असे नेते आहेत की त्यांचा निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत अंतिम आहे, असं मानलं जात नाही. जर इतक्या महत्त्वाच्या विषयावर शरद पवार यांच्या राजकीय गणितावर भाजपला आजही विश्वास असेल तर त्याच्या त्यांना शुभेच्छा, असं या नेत्याने म्हटलं आहे.

Follow Us
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान
काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
Gokul Milk Union : काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले..
Sanjay Raut vs Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले...
माझ्या गावाचा रस्ता... चिमुकल्याने थेट खासदारांनाच घेरलं; ओमराजेंचा...
माझ्या गावाचा रस्ता... चिमुकल्याने थेट खासदारांनाच घेरलं; ओमराजेंचा भन्नाट संवाद व्हायरल!
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?