उर्फी घाबरलेल्या अवस्थेत… जीव वाचवण्यासाठी पोलीस स्थानकात पोहोचली… म्हणाली, रात्रभर…

रिऍलिटी शो स्टार उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये, उर्फी हिने आलेल्या भयानक अनुभवाबद्दल सांगितलं आहे. सध्या सोशल मीडियावर उर्फी आणि तिच्या बहणीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.

उर्फी घाबरलेल्या अवस्थेत... जीव वाचवण्यासाठी पोलीस स्थानकात पोहोचली... म्हणाली, रात्रभर...
अभिनेत्री उर्फी जावेद
| Updated on: Dec 22, 2025 | 2:31 PM

Urfi Javed : रिऍलिटी शो स्टार उर्फी जावेद सध्या सर्वत्र चर्चेत आहे. उर्फी हिने मुंबई पोलिस स्टेशनमधील तिचा आणि तिच्या बहिणीचा फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. उर्फीने सोमवारी सकाळी हा फोटो शेअर केला आणि तो सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. पोलीस स्टेशनमध्ये नक्की काय घडलं याबद्दल उर्फी हिने काही सांगितलं नाही. पण तिचा आणि बहिणीचा फोटो पोलीस स्थानकातील फोटो समोर अल्यामुळे चर्चांना उधाण आहे… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्फी हिची चर्चा रंगली आहे.

उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर स्वतःचा आणि बहीण डॉली हिचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत उर्फी म्हणाली, ‘सर्वात भयानक अनुभव…’, उर्फी हिच्या बहिणीने देखील एक फोटो पोस्ट केला आहे.. ज्यामध्ये डॉली म्हणाली, ‘मुंबईत एका आठवड्यात दुसरी घटना… ज्यामुळे असुरक्षित वाटत आहे…’ सध्या दोन्ही बहिणींचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत…

उर्फी जावेदने 22 डिसेंबर रोजी सकाळी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मुंबईच्या दादाभाई नौरोजी पोलिस स्टेशनमधील काही फोटो शेअर केले. एका फोटोमध्ये ती आणि तिची बहीण पोलिस स्टेशनमध्ये दिसत आहेत. कॅप्शनमध्ये उर्फीने , “सकाळी 5 वाजले आहेत आणि मी पोलिस स्टेशनमध्ये आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव आहे. मी आणि माझ्या बहिणी एक मिनिटही झोपलो नाही.” असं लिहिलं आहे.

उर्फी हिची पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी तिला काय झालं असं विचारलं. दरम्यान, उर्फीची बहीण डॉली जावेदने तिची इंस्टाग्राम स्टोरी पुन्हा शेअर केली आणि लिहिलं, “अत्यंत भयानक अनुभव. मला वाटले की मुंबई सुरक्षित आहे???!!!! एका आठवड्यात हा माझा दुसरा अनुभव आहे जिथे मला किळस आणि असुरक्षित वाटलं आहे…’

उर्फी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, उर्फी जावेद कायम तिच्या लूकमुळे चर्चेत असते. स्वचःच्या विचित्र फॅशनमुळे देखील अनेकदा उर्फी हिला वादग्रस्त परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील उर्फी हिला कायम ट्रोल केलं जातं. उर्फी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.