AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा अल्लाहचा प्रकोप, कबरीत..; इराणवरील हल्ल्यांबाबत प्रसिद्ध अभिनेता काय म्हणाला?

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यापासून जगभरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देऊन मध्य पूर्वेतील अनेक देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत.

हा अल्लाहचा प्रकोप, कबरीत..; इराणवरील हल्ल्यांबाबत प्रसिद्ध अभिनेता काय म्हणाला?
एजाज खानImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 01, 2026 | 11:39 AM
Share

अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणविरोधात संयुक्त मोहीम हाती घेतली. इराणवर त्यांनी जोरदार हल्ले केले. इराणच्या धार्मिक, राजकीय आणि लष्करी नेतृत्वाला या हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आलं. इराणनेही इस्रायलसह कतार, कुवेत, बहारिन, संयुक्त अरब अमिराती इथल्या अमेरिकी लष्करी तळांवर प्रतिहल्ले केले. इराणचा पाठिंबा असलेले येमेनमधील हुती आणि लेबनॉनमधील हेजबोला हे गटही सक्रिय झाले आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात झालेल्या 12 दिवसांच्या युद्धापेक्षा या युद्धाची व्याप्ती आणि तीव्रता अधिक असल्याचं पहायला मिळतंय. या देशांमधील सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातील लोकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या संघर्षावर आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेता एजाज खानने प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिमांवरील हा अल्लाहचा प्रकोप आहे, असं त्याने म्हटलंय.

काय म्हणाला एजाज खान?

“जगभरात काय घडतंय, हे पाहताय ना तुम्ही.. दोन विलेन अमेरिका आणि इस्रायल यांनी रमजानच्या महिन्यात कसलाही विचार न करता इराणवर बॉम्बहल्ले केले. इराणला राग आला तर इराणने अरब लोकांवर बॉम्बहल्ले केले. मला असं वाटतं की इराणचा राग बरोबर आहे. तसंही पॅलेस्टाइन लोकांवर अत्याचार होतोय, मुस्लिमांवर अन्याय होतोय तरी अरब लोक गप्पच बसतात. त्यामुळे त्यांना झोपेतून जागं करणंही गरजेचं होतं. धन्यवाद इराण.. तुम्ही त्यांना जागं केलंत,” असं तो म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Ajaz Khan (@imajazkhan)

या व्हिडीओत एजाज पुढे म्हणतोय, “अल्लाह आपल्यावर नाराज आहे, म्हणूनच संपूर्ण जगभरात मुस्लिमांवर अत्याचार होतोय. रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व मुस्लिम देशांवर हल्ले होत आहेत. हा मुस्लिमांवर झालेला अल्लाहचा प्रकोप आहे. प्रार्थना करा, एकमेकांना आधार द्या, चांगली कामं करा, जकात (दान) द्या, गरिबांना मदत करा, पैसा कबरीत जाणार नाही.” एजाजच्या या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

कशासाठी होत आहेत हल्ले?

इराणने अण्वस्त्र विकास कार्यक्रम गुंडाळावा याबाबद अमेरिका आणि इस्रायलकडून सातत्याने दबाव होता. इराण युरेनियम समुद्धीकरणाची पातळी अणुऊर्जा कार्यक्रमापुरती मर्यादित ठेवण्यास राजी झाला होता. मात्र क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमही आवरता घ्यावा ही अमेरिकेची मागणी इराणला मंजूर नव्हती. यासंबंधी ओमानमध्ये वाटाघाटी सुरू होत्या. त्यांच्या समाप्तीआधीच अमेरिका आणि इस्रायलने हल्ले सुरू केले.

Follow Us
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी