AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण-इस्रायलच्या युद्धादरम्यान दुबईत अडकली प्रसिद्ध अभिनेत्री; मोदींकडे केली विनंती

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दुबई वर्ल्ड सेंटर- अल मक्तुम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. दुबईत अडकलेल्या या बॉलिवूड अभिनेत्रीने पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली आहे.

इराण-इस्रायलच्या युद्धादरम्यान दुबईत अडकली प्रसिद्ध अभिनेत्री; मोदींकडे केली विनंती
बॉलिवूड अभिनेत्रीImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 01, 2026 | 10:58 AM
Share

अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात संयुक्त मोहीम हाती घेऊन त्या देशावर जोरदार हल्ले केले. मात्र इराणनेही इस्रायलसह कतार, कुवेत, बहारिन, संयुक्त अरब अमिराती इथल्या अमेरिकी लष्करी तळांवर प्रतिहल्ले करून संघर्ष अधिक वाढवला. या हल्ल्यानंतर भारतीय विमान कंपन्यांसह जगभरातील कंपन्यांनी पश्चिम आशियातील विमानसेवा स्थगित केली आहे. इराण, इराक, कुवेत, इस्रायल आणि बहारिन या देशांची हवाई हद्द शनिवारी पूर्ण रिकामी होती. तर ग्रीस, स्पेन, फ्रान्स, तुर्कीस जपान, अझरबैजान, ब्रिटन, नॉर्वे इत्यादी देशांच्या विमान कंपन्यांनी विमान उड्डाणे रद्द केल्याचं जाहीर केलं. दुबई विमानतळावरील उड्डाणेसुद्धा रद्द करण्यात आली आहेत. तिथल्या एअरपोर्टवर अनेक प्रवासी अडकले आहेत. ‘जन्नत’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहानसुद्धा सध्या दुबईत असून तिने मदतीसाठी आवाहन केलं आहे.

सोनलने शनिवारी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली. त्यात तिने म्हटलंय, ‘आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी.. सध्या सुरु असलेल्या तणावादरम्यान मी दुबईत अडकले आहे. विमान उड्डाणं रद्द करण्यात आल्याने भारतात परतण्याचा कोणताही मार्ग स्पष्ट नाही. मला सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी कृपया मार्गदर्शन आणि मदत करा. मी तुमची खूप आभारी राहीन.’ फक्त सोनलच नाही तर ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूसुद्धा दुबई विमानतळावर अडकली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व उड्डाणं स्थगित करण्यात आल्याचं तिने सोशल मीडियावर सांगितलं आहे.

अभिनेत्रीची पोस्ट-

सोनलने 2008 मध्ये ‘जन्नत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिने इमरान हाश्मीसोबत मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने तेलुगू, कन्नड, तमिळ अशा इतर भाषिक चित्रपटांमध्येही काम केलं. दरम्यान अमेरिका, इस्रायल आणि इराणने संयम बाळगावा, चर्चा आणि मुत्सद्देगिरीचा वापर करून युद्ध टाळावं, तसंच सर्व नागरिकांच्या संरक्षणाची खबरदारी घ्यावी, असं आवाहन भारताने केलं आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबद्दल भारताला चिंता वाटत आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या प्रतिक्रियेत नमूद केलं आहे.

इराणने प्रत्युत्तर म्हणून केलेल्या हल्ल्यांमध्ये युएईवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये किमान एकाचा मृत्यू झाला. तर दुबईतील पाम जुमेराह या हॉटेलला आग लागली. त्यात किमान चौघे जखमी झाले. दुबईतील माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, जगातील सर्वांत उंच इमारत असलेली बुर्ज खलिफा ही इमारत रिकामी करण्यात आली आहे.

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..