Vandana Gupte : प्रयोगादरम्यान फोन वाजल्यावर थांबणाऱ्या कलाकारांचा मला राग…वंदना गुप्ते यांचं परखड मत

नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांचे फोन वाजतात. त्यामुळे बरेच कलाकार नाटक अर्धवट सोडून प्रेक्षकांना धारेवर धरतात. अशा कलांकावर वंदना गुप्ते यांना राग येतो. वंदना गुप्ते यांनी एका मुलाखतीत याबद्दल स्पष्ट मत मांडले आहे.

Vandana Gupte : प्रयोगादरम्यान फोन वाजल्यावर थांबणाऱ्या कलाकारांचा मला राग...वंदना गुप्ते यांचं परखड मत
vandana gupte
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 30, 2026 | 7:01 PM

नाटक किंवा सिनेमागृहात फोन सायलेंटवर ठेवणं याबद्दल सूचना नाटक सूरू होण्याच्या आधीही दिल्या जातात. पण कितीही काही केलं तरी, एक कोणतरी असतोच ज्याचा फोन प्रयोगादरम्यान मोठ्याने वाजतो आणि त्याचा त्रास प्रेक्षकांसह नाटकातील कलांकारांना देखील होतो. काही जण याकडे दुर्लक्ष करतात, तर काही कलाकार नाटक मध्येच थांबवून प्रेक्षकांना धारेवर धरतात. यावर वंदना गुप्ते यांनी परखडं मत मांडलं आहे.

वंदना गुप्ते म्हणाल्या की, ‘नाटक सुरू असताना कोणाचा फोन वाजला तरीही मी कधीच थांबत नाही. ही आजची मुलं थांबतात, दर्शवतात. कशाला? म्हणजे तुम्ही नाटकात इन्हॉल्व नसता. तीन तासांच्या प्रयोगामध्ये जर तुमची इन्व्हॉलमेंट नसेल. तर याचा अर्थ नाटकात तुमचं लक्ष नाहीये. रिंग वाजली तर तुमचं लक्ष विचलित होत असेल तर असं कसं चालेल?

Loading...

‘चार चौघी नाटकात माझा 20 मिनिटांचा मोनोलॉग होता. तो मोनोलॉग सुरू व्हायच्या आधी मी डोअर किपरला सूचना देऊन ठेवायचे. त्या 20 मिनिटांत मी कोणालाही बाहेर जाऊ द्यायंच नाही आणि बाहेरून कोणाला आतमध्ये यायचं नाही. कारण, मी ते एकटीने बोलायचे. बाकी इतर वेळी सगळ्यांसोबत संवाद असतात. त्यामुळे फोन वाजला तरी त्यांना प्रत्येकवेळी आठवण करून द्यायची नाही. मला अशा अभिनेत्यांचा राग येतो. प्रेक्षकांनाही समजतं, त्यांच्याकडून चूक झालीये. हे शिक्षण मला अरविंद देशपांडे यांच्याकडून मिळालं.’ असं वंदना गुप्ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.

स्वत: चा अनुभव सांगताना वंदना गुप्ते म्हणाल्या की, ‘मी अरविंद देशपांडे यांच्यासोबत एक नाटकं केलेलं. त्या नाटकात मी छोटी भूमिका साकारली होती. त्यावेळी त्या नाटकाचा कोकण दौरा चालू होता. ओपन थिएटर होतं. रंगमंचावर अरविंद देशपांडे, मी आणि निवेदिता सराफ होतो. पहिल्या अंकांचा पडदा पडतो आणि माझी एक्झिट होते. स्टेजच्या
मागे आंब्याचं झाड होतं, त्यावरचा आंबा माझ्यासमोर पडला. मी जाता-जाता तो आंबा उचलला. नंतर आतमध्ये आल्यावर अरविंद देशपांडे माझ्यावर खूप भडकले. ‘त्या दोन तासात तुमची नाटकाच्या बाहेरचा विचारच कसा करता? तो आंबा तिथे राहिला असता तर काय झालं असतं?’ असं अरविंद सर मला म्हणाले. त्यामुळे असं कोणी थांबलं की, मला राग येतो. पण, मी बोलत नाही. आजच्या मुलांनी याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि प्रयोग पुढे सुरू ठेवला पाहिजे.’

दरम्यान, वंदना गुप्तेंनी आजवर चारचौघी, सुंदर मी होणार, चार दिवस प्रेमाचे, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला यांसारख्या नाटकांत काम केलं आहे. तर बाईपण भारी देवा, पछाडलेला, अशी ही जमवा जमवी यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us