Chanakya Niti : आयुष्याची परीक्षा पाहणाऱ्या काळात कधीच निराश होऊ नका, चाणक्यांचा या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात अनेकदा असे कठीण प्रसंग येतात, तेव्हा माणूस खचून जातो. परंतु अशा परिस्थितीमध्ये काही गोष्टी या कायम लक्षात ठेवाव्यात.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना आयुष्य कसं जगावं? याचं मार्गदर्शन करतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात अनेकदा माणसाच्या आयुष्यात असे कठीण प्रसंग येतात, ज्यामधून मार्ग काढणं, त्यातून बाहेर पडणं हे त्याला अशक्य वाटत असतं. मात्र इथेच तर खरी गंमत आहे. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात संयम ठेवला तर या जगात अशी एकही गोष्ट नाही जी तुमच्यासाठी अशक्य आहे. माणसाच्या आयुष्यात जेव्हा-जेव्हा असे कठीण प्रसंग येतात, तेव्हा त्याने एकच गोष्ट करायची ती म्हणजे तीन गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. या तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर या जगात असा एकही व्यक्ती नाही, जो तुमचा पराभव करू शकेल, किंवा असंही एकही संकट नाही, जे तुम्हाला अडचणीत आणू शकेल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग आज या तीन गोष्टींबद्दल जाणून घेऊयात, ज्या चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आल्या आहेत.
संयम – चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात संयम हा असलाच पाहिजे. जर तुमच्याकडे संयम असेल तर हे संपूर्ण जग जिंकण्याची ताकद तुमच्याकडे असते, त्यामुळे जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येईल तेव्हा-तेव्हा संयम ठेवा. तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही एक दिवस त्यातून नक्की मार्ग काढाल.
शांतता – चाणक्य म्हणतात संकट काळात क्रोध करू नका, शांत राहा, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा तुम्हाला क्रोध येतो, तेव्हा तुम्ही रागाच्या भरात अनेक चुकीचे निर्णय देखील घेऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही समस्येवर शांततेच मार्ग काढणं हे कधीही चांगलं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
योजना गुप्त ठेवा – चाणक्य म्हणतात तुम्ही संकटातून बाहेर पडण्यासाठी जी काही योजना आखली असेल ती नेहमी गुप्त ठेवा. ती कोणालाही सांगू नका. तुम्ही जर ही योजना कोणाला सांगितली तर त्यामुळे तुमचा प्लॅन फसू शकतो, असं चाणक्य म्हणतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
