AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची नवी योजना! प्रत्येक महिन्याला मिळणार 5,550 रूपये

निवृत्तीनंतर नियमित पैशांची सोय असावी यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या बचत योजनांचा शोध घेत असतात. अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना एक पर्याय ठरू शकते. पोस्ट ऑफिसची ही योजना केंद्र सरकारच्या लघुबचत योजनांपैकी एक आहे

| Updated on: Oct 30, 2026 | 8:12 PM
Share
नोकरी असो किंवा व्यवसाय, प्रत्येकालाच दर महिन्याला ठराविक उत्पन्न मिळावं असं वाटतं. विशेषत: निवृत्तीनंतर नियमित पैशांची सोय असावी यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या बचत योजनांचा शोध घेत असतात. अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना एक पर्याय ठरू शकते.

1 / 7
या योजनेत फक्त एकदाच पैसे गुंतवायचे आणि त्यावर दर महिन्याला ठराविक उत्पन्न मिळवायचं. सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिना 5, 550 रूपये मिळू शकतात.

या योजनेत फक्त एकदाच पैसे गुंतवायचे आणि त्यावर दर महिन्याला ठराविक उत्पन्न मिळवायचं. सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिना 5, 550 रूपये मिळू शकतात.

2 / 7
पोस्ट  ऑफिसची ही योजना केंद्र सरकारच्या लघुबचत योजनांपैकी एक आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या तिमाहीसाठी या योजनेवर वार्षिक 7.4 टक्के व्याजदर लागू आहे. या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा असून व्याजाची रक्कम दर महिन्याला खातेदाराला दिली जाते.

3 / 7
समजा एखाद्या व्यक्तीने या योजनेत 9 लाख रूपये गुंतवले, तर 7.4 टक्के व्याजदरानुसार वर्षाला 66 हजार 600 रूपये व्याज मिळेल. म्हणजेच दर महिन्याला 5, 550 रूपये  खात्यात जमा होतील. 5 वर्षांच्या कालावधीत एकूण 3 लाख 33 हजार रूपये व्याज मिळेल. मुदत पूर्ण झाल्यानंतर गुंतवलेली मूळ रक्कम म्हणजेच 9 लाख रूपये परत मिळतात.

4 / 7
या योजनेत एकट्या व्यक्तीच्या खात्यासाठी कमाल  गुंतवणूक मर्यादा 9 लाख रूपये आहे. तर संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रूपये गुंतवता येतात. संयुक्त खात्यात 15 लाख रूपये गुंतवल्यास सध्याच्या व्याजदरानुसार दरमहा 9 हजार 250 रूपये मिळू शकतात. या योजनेत किमान 1 हजार रूपयांपासून गुंतवणूक करता येते.

5 / 7
मात्र पैसे गुंतवण्याआधी काही नियम समजून घेणंही महत्त्वाचं आहे. खाते सुरू केल्यानंतर पहिल्या वर्षांत ते बंद करता येत नाही. 1 ते 3 वर्षांच्या आत खाते बंद केल्यास मूळ रकमेच्या 2 टक्के कपात केली जाते. तीन वर्षांनंतर आणि 5 वर्षांपूर्वी खाते बंद केल्यास 1 टक्का कपात होतो.

6 / 7
यातील व्याजावर नियमानुसार कर लागू होतो. त्यामुळे ही योजना निवडण्याआधी आपली आर्थिक गरज, कर आणि गुंतवणूकीच्या कालावधी लक्षात घेणं गरजेचं आहे.

यातील व्याजावर नियमानुसार कर लागू होतो. त्यामुळे ही योजना निवडण्याआधी आपली आर्थिक गरज, कर आणि गुंतवणूकीच्या कालावधी लक्षात घेणं गरजेचं आहे.

7 / 7
Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान