Vandana Gupte : मनात एक आणि बाहेर एक असं…नाना पाटेकर यांच्याबद्दल काय म्हणाल्या वंदना गुप्ते?

Vandana Gupte On Nana Patekar : वंदना गुप्ते यांनी एका मुलाखतीत नाना पाटेकर यांच्याबद्दल भाष्य केलं आहे.

Vandana Gupte : मनात एक आणि बाहेर एक असं...नाना पाटेकर यांच्याबद्दल काय म्हणाल्या वंदना गुप्ते?
| Updated on: Oct 13, 2026 | 4:49 PM

नाना पाटेकर यांचं वयाच्या 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. नाना पाटेकर यांच्या निधनानं कलाविश्वाला धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी आणि राजकीय नेत्यांनी नाना पाटेकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या आठवणी शेअर करत आहेत. अशातच अभिनेत्री वंदना गुप्ते यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे.

वंदना गुप्ते यांची प्रतिक्रिया

Loading...

नाना पाटेकर यांच्याबद्दल बोलताना वंदना गुप्ते म्हणाल्या की, ‘स्वबळावर त्यानं इंडस्ट्रीत स्थान निर्माण केलं आहे. स्वतःच्या मनासारखं तो जगला. जे नाही आवडलं ते त्यानं नाहीच केलं. आपल्या मस्तीत जगला. हिंदी इंडस्ट्रीत त्याचं नाव घेतलं तरी थरथर कापणारी माणसं आहेत. आतून–बाहेरून एकसारखा होता. अशी माणसं फार कमी असतात. नाना आत एक बाहेर एक असं दाखवणारा माणूस नव्हता.’

‘सगळ्या कला त्याच्यात होत्या. मोठेपण घेऊन कधीच फिरला नाही. स्वतः गाडी चालवायचा. जेवण स्वतः करायचा. आईसाठी सगळं करायचा. खूप मनस्वी होता. जनतेसाठी कायम मदतशील असायचा.’ असं ‘झी 24 तास‘सोबत साधलेल्या संवादात वंदना गुप्ते बोलत होत्या.

तसेच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत वंदना गुप्ते म्हणाल्या की, ‘नाना रोखठोक माणूस होता, त्याला काम जमणार नसेल तर हातच लावणार नाही. पण जर एखादं काम हाती घेतलं तर ते तडीस नेणारच असा त्याचा स्वभाव होता. अगदी सामाजिक काम असेल, तरीही हमखास उडी मारायचा आमचा नाना. मला फक्त इतकंच वाईट वाटतं की, त्याच्याबरोबर काम करायची मला संधी मिळाली नाही. नानाचं पाठांतर तर अप्रतिम होतं. नानाला एक मच्छर कविता सुचली होती. किती साधी होती ती पण त्याला सुचली. मातीतला माणूस होता, मातीतला नट आज आपल्याला सोडून गेला आहे.

दरम्यान, नाना पाटेकर यांनी मृत्यूपूर्वी त्यांच्या जवळच्या मित्राला अस्वस्थ वाटत असल्याचा मेसेज केला होता. त्यानंतर नानांचा मित्र त्यांच्या घरी पोहोचला आणि त्यानं नानांच्या केअरटेकरला रुग्णवाहिका आणण्यासाठी पाठवलं. नानांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 45 मिनिटं नाना पाटेकर यांना सीपीआर देण्यात आला. मात्र, डॉक्टर नानांना वाचवू शकले नाहीत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us