Anupama : वनराज-काव्याचं लग्न, मदालसा चक्रवर्तीनं परिधान केला 10 किलोचा लेहेंगा

मदालसाबद्दल बोलायचं झालं तर तिचं लग्न मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय चक्रवर्तीशी झालं आहे. (Vanraj-Kavya's wedding, Madalasa Chakraborty wears 10 kg lehenga)

| Edited By: VN | Updated on: Jun 05, 2021 | 10:30 AM
1 / 5
मादालसा शर्माचा हा पहिलाच शो आहे आणि या शोमध्ये तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. या दिवसात मालिकेत मदालसा (Kavya) आणि सुधांशु (Vanraj) यांच्या लग्नाचा पार्ट सुरू आहे.

मादालसा शर्माचा हा पहिलाच शो आहे आणि या शोमध्ये तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. या दिवसात मालिकेत मदालसा (Kavya) आणि सुधांशु (Vanraj) यांच्या लग्नाचा पार्ट सुरू आहे.

2 / 5

टीव्हीचा नंबर वन शो अनुपमा आपल्या कथानकामुळे चर्चेत आहे. या शोमध्ये रूपाली गांगुली आणि सुधांशु पांडे मुख्य भूमिकेत आहेत. या शोमध्ये मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा देखील मुख्य भूमिकेत आहेत.

3 / 5

यासाठी, मदालसानं एक सुंदर गुलाबी लेहंगा कॅरी केला होता. लेहेंगाचं वर्णन करताना मदालसा म्हणाली की तिनं लग्नासाठी घातलेला लेहेंगा 10 किलोचा आहे. हा लेहेंगा घालणं तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. तरी तिनं सर्वोत्तम कामगिरी केली.

4 / 5

मदालसाबद्दल बोलायचं झालं तर तिचं लग्न मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय चक्रवर्तीशी झालं आहे. तर मदालसाची आई देखील एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिच्या आईचे नाव शीला डेव्हिड आहे.

5 / 5

शोमध्ये तिच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ग्रीन कलरचे कुंदन असलेली ज्वेलरी आणि पिंक लेहेंगा कॅरी केला होता. कपाळावर पट्टी, राणी हार, चोकर हार, संपूर्ण दागिन्यांमुळे ती अधिकच सुंदर दिसत होती. शोच्या कथानकाविषयी बोलायचं झालं तर अनुपमा आणि वनराजचा घटस्फोट झाला आहे. त्याच वेळी काव्या वनराजशी लग्न करण्यास उत्सुक होती. अखेर आता दोघांचंही लग्न झालं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us