New Song : ‘वाटेवरी मोगरा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा मानसी आणि प्रदीप खरेराचा रोमँटिक अंदाज

वाटेवरी मोगरा या गाण्याच्या निमित्तानं सागरिका म्युझिक, वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर या कलाकारांच्या सुरेख गाण्याची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली आहे. सोबतच या गाण्यात मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा या जोडीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय (‘Vatevari Mogra’ song is out for the audience, see Mansi and Pradeep Kharera's romantic video)

New Song : ‘वाटेवरी मोगरा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा मानसी आणि प्रदीप खरेराचा रोमँटिक अंदाज
| Updated on: Mar 13, 2021 | 2:37 PM

मुंबई : सागरिका म्युझिक, वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर या कलाकारांच्या सुरेख गाण्याची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली आहे. निलेश मोहरीर यांनी ‘वाटेवरी मोगरा’ या गाण्याची सुंदर रचना केली आहे. सागरिका म्युझिक सोबतच निलेश यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. श्रीपाद जोशी या आगामी प्रतिभावान गीतकारानं या गाण्याचे शब्द लिहिले आहेत. (‘Vatevari Mogra’ song is out for the audience, see Mansi and Pradeep Kharera’s romantic video)

सागरिका दास यांनी केलं म्युझिक व्हिडीओचं दिग्दर्शन 

वैशाली आणि स्वप्नील यांनी सागरिका म्युझिकसाठी आतापर्यंत 100 पेक्षा अधिक गाणी गायली आहेत आणि त्यात हे गाणं पहिल्या 10 मध्ये नक्कीच येणार. गाण्याचा ऑडिओ उत्तम कलाकारांसोबत असेल तर व्हिडीओच्या बाबतीतही काही वेगळं नाही. या गाण्याच्या म्युझिक व्हिडीओचं दिग्दर्शन सागरिका दास यांनी केलं आहे.

आतापर्यंत 50 पेक्षा अधिक म्युझिक व्हिडीओंचे दिग्दर्शन

सागरिका यांनी 50 पेक्षा अधिक म्युझिक व्हिडीओंचे दिग्दर्शन केलं आहे. ज्यात हळू हळू चाल , सावली उन्हामध्ये , मस्त चाललंय आमचं, राधा राधा या सारख्या व्हिडीओचा समावेश आहे. मानसी नाईक गेल्या काही वर्षांमध्ये सागरिकाच्या अनेक व्हिडीओंमध्ये झळकलेली आहे. मात्र ‘वाटेवरी मोगरा’ या गाण्यामध्ये ती पूर्णपणे नवीन अवतारात दिसली आहे. मानसी नाईकचा आत्तापर्यंतचा हा पहिलाच रोमँटिक म्युझिक व्हिडिओ आहे.

मानसी नाईक आणि प्रदीप खरोराचा रोमँटिक अंदाज

नवीनच लग्न झालेल्या मानसी सोबत तिचा नवरा प्रदीप खरेरा या गाण्यात तिच्यासोबत असल्यामुळेच हा म्युझिक व्हिडीओ अजूनच खास झाला आहे. यावर्षी 19 जानेवारीला मानसीनं आंतरराष्ट्रीय बॉक्सर आणि अभिनेता असलेल्या प्रदीप खरेरासोबत लग्न केलं आणि या म्युझिक व्हिडीओतून ते पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत.

निलेश मोहरीरचं सुमूधर संगीत, श्रीपाद जोशी यांचे सुंदर शब्द, वैशाली आणि स्वप्नीलचे अगदी सुंदर गायन, यासोबत सागरिका दास यांनी दिग्दर्शित केलेला ग्लॅमरस म्युझिक व्हिडीओ आणि मानसी-प्रदीपचा रोमँटिक अंदाज ही या म्युझिक व्हिडीओची खास वैशिष्ट्य आहेत.

संबंधित बातम्या

Marathi Movie : वडील-मुलाच्या नात्याची कथा मांडणारा ‘अवांछित’, पाहा चित्रपटाचा खास ट्रेलर

Marathi Serial : ‘तुमच्या लाडक्या कलाकारांनी स्विकारलं सोशल मीडियावरील चॅलेंज’, पाहा व्हिडीओ