कतरिनाशी लग्नाच्या निर्णयावर विकी कौशलच्या आईवडिलांची अशी होती प्रतिक्रिया; आता झाला खुलासा

जेव्हा विकीने आईवडिलांना सांगितलं, "कतरिनाशी लग्न करतोय"; त्यावर ते म्हणाले..

कतरिनाशी लग्नाच्या निर्णयावर विकी कौशलच्या आईवडिलांची अशी होती प्रतिक्रिया; आता झाला खुलासा
Vicky Kaushal and Katrina Kaif
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 20, 2022 | 1:40 PM

मुंबई: अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाला नुकतंच वर्ष पूर्ण झालं. सध्या विकी त्याच्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याच प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत त्याने नात्यांमधील विश्वासाबद्दल प्रतिक्रिया दिली. त्याचसोबत जेव्हा त्याच्या आईवडिलांना कतरिनाशी लग्न करणार असल्याचं सांगितलं, तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती, याचाही खुलासा विकीने या मुलाखतीत केला.

फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत विकी म्हणाला, “मला प्रामाणिकपणावर खूप विश्वास आहे. मी स्वत:लाही एक सच्चा व्यक्ती समजतो. फक्त रोमँटिक नात्यांमध्येच नाही तर प्रत्येक नात्यात प्रामाणिक असणं खूप महत्त्वाचं असतं. मग ती मैत्री असो, रोमँटिक नातं असो, भाऊ-बहीण असो, आई-वडील असो किंवा आणखी काही.. असे माझे वैयक्तिक विचार आहेत.”

“नात्यात प्रामाणिकता असेल तर तुम्हाला शांती आणि सुखाची अनुभूती होते. ज्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही प्रेमाचा खरा अनुभव मिळतो. जेव्हा तुम्हाला प्रेम मिळतं तेव्हा तुम्ही ते इतरांनाही देता. तुमच्यातील चांगलं व्यक्तीमत्त्व यामुळे बाहेर पडलं, असं मला वाटतं. कतरिना माझी जोडीदार असणं ही सर्वांत सुंदर बाब आहे”, असंही तो पुढे म्हणाला.

विकीने जेव्हा त्याच्या लग्नाचा निर्णय कुटुंबीयांना सांगितला, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती, याचाही खुलासा त्याने केला. “ते खूप खूश होते. ते तिला खूप पसंत करतात. ती जशी आहे, तशीच त्यांना आवडते. मला असं वाटतं जेव्हा तुमच्या मनात काही चांगल्या गोष्टी असतात, तेव्हा प्रत्येक ठिकाणी त्या दिसून येतात”, असं विकीने सांगितलं.