AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : धर्मेंद्रसारखं नवऱ्याला कपाटाला बांधलं, इराणी महिलेचे शोले, ‘जब तक है जान’ गाण्यावर हेमा मालिनी स्टाईल डान्स

शोले'ला इतकी वर्षे झाली पण आजही या चित्रपटातील गाणे, डायलॉग कॉपी करुन लोक त्याचे व्हिडीओ बनवत असतात आणि ते सोशल मीडियावर टाकत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय.

VIDEO : धर्मेंद्रसारखं नवऱ्याला कपाटाला बांधलं, इराणी महिलेचे शोले, 'जब तक है जान' गाण्यावर हेमा मालिनी स्टाईल डान्स
| Updated on: Mar 30, 2021 | 4:05 PM
Share

नवी दिल्ली : हिंदी चित्रपट सृष्टीतील आयकॉनिक फिल्म म्हणवल्या जाणाऱ्या ‘शोले’ची क्रेज आजही लोकांच्या मनात कायम असल्याचं पाहायला मिळतं. ही क्रेज फक्त भारतीय प्रेक्षकवर्गातच नाही तर बॉलिवूडचे चाहते असलेल्या परदेशी प्रेक्षकांमध्येही दिसून येते. ‘शोले’ला इतकी वर्षे झाली पण आजही या चित्रपटातील गाणे, डायलॉग कॉपी करुन लोक त्याचे व्हिडीओ बनवत असतात आणि ते सोशल मीडियावर टाकत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय.(Iranian woman dances like Basanti in Sholay movie)

इराणच्या एका महिलेने शोले चित्रपटातील गाण्यावर केलेला डान्स तुफान व्हायरल होत आहे. ‘शोले’तील ‘जब तक है जान…’ या गाण्यावर ही इराणी महिला शोलेतील बसंतीप्रमाणे आपली कंबर हलवताना पाहायला मिळतेय. इतकच नाही तर हे संपूर्ण गाणं त्यांनी शोलेतील चित्र डोळ्यासमोर ठेवून चित्रित केलं आहे. त्यानुसारच त्यांनी हा व्हिडीओ शूट केला आहे.

‘शोले’ उभारण्याचा प्रयत्न

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की पूर्ण सीन शोले चित्रपटाप्रमाणे तयार केला आहे. हा व्हिडीओ इनडोअर शूट केला असला तरी चित्रपटातील वातावरण निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. चित्रपटातील कॅरेक्टरही उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. व्हिडीओमध्ये ती महिला हेमा मालिनी अर्थात शोलेतील बसंतीप्रमाणे डान्स करताना दिसतेय. तर विरूला दोरीच्या सहाय्याने बांधून ठेवण्यात आलं आहे. तर गब्बर समोर उभे राहत डान्सचा आनंद घेत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडताना दिसतोय.

सोशल मीडियावर धुमाकुळ

हा व्हिडीओ @Sheri_happy नावाच्या यूजरने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. तर एक हजारापेक्षा जास्त रि-ट्विट्स मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओवर लोक अधिकाधिक कमेंट्स करत आहेत.

इतर बातम्या :

Video | नारळ वाढवून अभिनेत्याच्या फोटोची पूजा, पवन कल्याणच्या ‘वकील साब’च्या ट्रेलर लाँच दरम्यान थिएटरमध्ये राडा!

Nachiket Lele | नचिकेत लेलेला एलिमिनेट केल्याने चाहते खवळले, ‘इंडियन आयडॉल 12’च्या मेकर्सवर साधला निशाणा!

Iranian woman dances like Basanti in Sholay movie

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.