Nachiket Lele | नचिकेत लेलेला एलिमिनेट केल्याने चाहते खवळले, ‘इंडियन आयडॉल 12’च्या मेकर्सवर साधला निशाणा!

Nachiket Lele | नचिकेत लेलेला एलिमिनेट केल्याने चाहते खवळले, ‘इंडियन आयडॉल 12’च्या मेकर्सवर साधला निशाणा!
नचिकेत लेले

एलिमिनेशन राऊंडमध्ये मोहम्मद दानिश, सवाई भट आणि नचिकेत लेले अशा तीन स्पर्धकांचा समावेश होता. या तिघांमध्ये सर्वात कमी मते मिळाल्याने नचिकेत लेले याला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

Harshada Bhirvandekar

|

Mar 30, 2021 | 1:31 PM

मुंबई : सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’मध्ये (Indian Idol 12) गेल्या आठवड्यात मोठे एलिमिनेशन झाला. आयडॉलच्या होळी विशेष भागामध्ये ऑन-स्टेज होस्ट आदित्य नारायण याने जाहीर केले की, मागील आठवड्यातील मतांच्या आधारे एका स्पर्धकाला या कार्यक्रमातून पुन्हा घरी जावे लागेल. सर्वात कमी मते मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील स्पर्धक गायक नचिकेत लेले (Nachiket Lele) याला या कार्यक्रमातून घरी परतावे लागले. नीतू कपूर यांची विशेष उपस्थिती असलेल्या या भागात तीन स्पर्धकांमध्ये एलिमिनेशन जाहीर होणार होते. यात नचिकेतला सर्वात कमी मते मिळाली आणि तो एलिमिनेट झाला (Nachiket Lele eliminated from Indian Idol 12 fans and social media user called unfair decision).

या एलिमिनेशन राऊंडमध्ये मोहम्मद दानिश, सवाई भट आणि नचिकेत लेले अशा तीन स्पर्धकांचा समावेश होता. या तिघांमध्ये सर्वात कमी मते मिळाल्याने नचिकेत लेले याला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पण, सोशल मीडियावर नचिकेत याच्या एलिमिनेशनला चाहत्यांनी ‘अयोग्य निर्णय’ म्हटले आहे. नचिकेतच्या एलिमिनेशननंतर त्याचे चाहते कमालीचे खवळले आहेत. या एलिमिनेशनचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत.  इंडियन आयडॉलमध्ये गाण्याऐवजी स्पर्धकाच्या भावनिक कथेकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचा आरोपही प्रेक्षकांनी केला आहे.

पाहा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

(Nachiket Lele eliminated from Indian Idol 12 fans and social media user called unfair decision)

 (Nachiket Lele eliminated from Indian Idol 12 fans and social media user called unfair decision)

सिरीशा आणि नचिकेत यांच्या एलिमिनेशनमुळे चाहते नाराज

एलिमिनेशन झाल्यानंतरही नचिकेतने त्याच्या सोशल मीडियावर ‘इंडियन आयडॉल 12’च्या निर्मात्यांचे, तसेच सर्व स्पर्धक, परीक्षकांचे आभार मानले आहेत. पण चाहते म्हणतात की, ‘नचिकेत हा इंडियन आयडॉलमधील प्रतिभावान स्पर्धकांपैकी एक आहे. त्याची विजेता होण्याची गुणवत्ता आहे.’ एका चाहत्याने लिहिले की, ‘नचिकेतने या मंचावर सादर केलेले  ‘एक चतुर नार’ हे गाणे त्याच्यासारखे कोणीही गाऊ शकत नाही.’ खरं तर सिरीशा आणि नचिकेत या स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे बरेच चाहते संतप्त झाले आहेत.

या पर्वाचे ‘टॉप 9’ स्पर्धक

‘इंडियन आयडॉल 12’ मधून आतापर्यंत 6 स्पर्धक बाहेर आहेत. साहिल सोलंकीला प्रथम बाद केले गेले. साहिलनंतर सम्यक प्रसन्ना आणि वैष्णव गिरीश शोमधून बाहेर पडले. या तिघांनंतर उर्वरित तीन एलिमिनेशन हे जनतेच्या मतांवर आधारित होते. ज्यामध्ये अनुष्का बॅनर्जी प्रथम बाद झाली आणि आता नचिकेतच्या आधी सिरीशा बाद झाली होती. आता या पर्वाच्या ‘टॉप 9’ स्पर्धकांमध्ये पवनदीप राजन, अरुनिता कांजिलाल, सायली कांबळे, अंजली गायकवाड, आशिष कुलकर्णी, निहाल तारो, मोहम्मद दानिश, षण्मुख प्रिया आणि सवाई भट हे स्पर्धक आहेत. या पर्वाचा संभाव्य विजेता म्हणून पवनदीपकडे पाहिले जात आहे.

(Nachiket Lele eliminated from Indian Idol 12 fans and social media user called unfair decision)

हेही वाचा :

Akshay Kumar | अक्षय कुमारने सुरु केले ‘राम सेतु’चे चित्रीकरण, लूकविषयी सांगताना म्हणाला…

Funny Video | बॉबी देओलला कित्येक वर्षांपूर्वीच माहित होता ‘कोरोना’, ऐश्वर्याची केली होती स्वॅब टेस्ट! पाहा भन्नाट व्हिडीओ

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें