शोले’मधील गब्बरचा डायलॉग ऐकवून लोकांना घाबरवणे पडले महागात; पोलीस अधिकाऱ्याला नोटीस

के.एल. डांगी पोलीस व्हॅनमधील ध्वनीक्षेपकावरुन लोकांना सूचना देताना दिसत आहेत. | cop seen reiterating Sholay dialogue

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:53 AM, 16 Nov 2020
Show cause notice issued to cop seen reiterating Sholay dialogue in viral video

भोपाळ: लोकांना कायद्याचा धाक वाटावा म्हणून ‘शोले’ चित्रपटातील गब्बर सिंहची स्टाईल कॉपी करणे मध्य प्रदेशातील एका पोलीस अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली असून त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. (KL Dangi in charge of Kalyanpura police station reiterating Sholay dialogue in viral video)

मध्य प्रदेशच्या जाहुबा येथील कल्याणपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला होता. या प्रसंगाची व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये कल्याणपुरा पोलीस स्थानकाचे प्रभारी के.एल. डांगी पोलीस व्हॅनमधील ध्वनीक्षेपकावरुन लोकांना सूचना देताना दिसत आहेत. यावेळी के.एल. डांगी लोकांमध्ये जरब निर्माण करण्यासाठी गब्बर सिंहचा डायलॉग ऐकवताना दिसत आहेत. ‘कल्याणपुरा से 50-50 कोस की दुरी पर जब बच्चा रोता है तो मा कहती है चुप हो जा बेटा नही तो डांगी आ जायेगा’, असे त्यांनी म्हटले होते.


त्यानंतर ही क्लीप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. तेव्हा ही क्लीप वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस पडली. यानंतर के.एल. डांगी यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. आता के.एल. डांगी यांची प्राथमिक चौकशी होऊन त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या:

सोलापुरात शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन, टॉवरवरुन खाली उतरवताना प्रशासनाच्या नाकीनऊ

ट्रम्प यांच्या भाषणात बॉलिवूडचा उल्लेख, ‘शोले’ आणि ‘डीडीएलजे’चं कौतुक

शरद पवारांची अवस्था ‘शोले’तल्या जेलरसारखी : मुख्यमंत्री

(KL Dangi in charge of Kalyanpura police station reiterating Sholay dialogue in viral video)