Video | नारळ वाढवून अभिनेत्याच्या फोटोची पूजा, पवन कल्याणच्या ‘वकील साब’च्या ट्रेलर लाँच दरम्यान थिएटरमध्ये राडा!

अभिनयाबरोबरच आता राजकारणात सक्रीय झालेल्या पवन कल्याणच्या (Pawan Kalyan) ‘वकील साब’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी या थिएटरमध्ये मोठ्या संख्येने चाहते जमले होते. 29  मार्च रोजी तेलुगू भाषिक राज्यातील काही चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.

Video | नारळ वाढवून अभिनेत्याच्या फोटोची पूजा, पवन कल्याणच्या ‘वकील साब’च्या ट्रेलर लाँच दरम्यान थिएटरमध्ये राडा!
‘वकील साब’ ट्रेलर लाँच
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 2:39 PM

मुंबई : सोमवारी (29 मार्च) आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरातील संगम शरथ थिएटरमध्ये मोठा गदारोळ मजला होता. या गदारोळाला कारण ठरला ‘वकील साब’ (Vakeel Saab) या चित्रपटाचा ट्रेलर. अभिनयाबरोबरच आता राजकारणात सक्रीय झालेल्या पवन कल्याणच्या (Pawan Kalyan) ‘वकील साब’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी या थिएटरमध्ये मोठ्या संख्येने चाहते जमले होते. 29  मार्च रोजी तेलुगू भाषिक राज्यातील काही चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. यावेळी चाहत्यांचा उत्साह इतका होता की, ट्रेलर प्रदर्शनाच्या 2 तास आधीच थिएटरमध्ये पोहोचले आणि त्यांनी पवन कल्याणच्या फोटोला नारळ अर्पण करुन, चक्क त्या फोटोची पूजा केली (Actor Pawan Kalyan film Vakeel Saab trailer launch fans chaos at theater).

या दरम्यान गर्दी झाल्याने मोठा गदारोळ माजला. या गोंधळाच्या वेळी थिएटरच्या काचा देखील फुटल्या. मात्र, या सगळ्याचा चाहत्यांचा उत्साहावर काडीमात्रही परिणाम झाला नाही आणि ते आणखी मोठ्या संख्येने थिएटरमध्ये पोहोचले.

पाहा व्हिडीओ

होळीच्या दिवशी चित्रपट निर्मात्यांनी ‘वकील साब’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. तर, दुसरीकडे पवन कल्याणच्या चाहत्यांनी यावेळी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. महत्त्वाचे म्हणजे तब्बल दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर पवन कल्याण ‘वकील साब’ चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा मोठ्या पडद्यावर परतत आहे. ‘वकील साब’ हा तेलगू भाषेतील चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या ‘पिंक’ या हिंदी चित्रपटाचा रिमेक आहे (Actor Pawan Kalyan film Vakeel Saab trailer launch fans chaos at theater).

पाहा चित्रपटाचा ट्रेलर

पवन कल्याणचा ‘वकील साब’ बॉलिवूड चित्रपट ‘पिंक’चा अधिकृत तेलुगु रीमेक आहे. या चित्रपटात अभिनेते पवन कल्याण यांच्यासह अभिनेत्री अंजली, निवेथा थॉमस, अनन्या आणि प्रकाश राज यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘पिंक’ या चित्रपटातून अभितेने अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘वकील साब’ वेणू श्रीराम यांनी दिग्दर्शित केला असून, दिल राजू आणि बोनी कपूर यांनी निर्मित केला आहे.

अभिनेता पवन कल्याणची कारकीर्द

पवन कल्याण यांनी 1999मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अक्कदा अम्माई इक्कादा अब्बाई’ चित्रपटातून अभिनेता म्हणून फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. या नंतर त्याने ‘गोकुलम्लो सीता’, ‘सुसवाथम’, आणि ‘थोली प्रेमा’ या चित्रपटांत दमदार अभिनय करत प्रेक्षकांची मने जिंकली. पवन कल्याण यांनीही दिग्दर्शक म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केले जोते. पण, त्याला फारसे यश मिळू शकले नाही. पवनला अखेर 2018मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अग्न्याथवासी’ या चित्रपटात पाहिले गेले होते. त्यानंतर आता तो ‘वकील साब’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

(Actor Pawan Kalyan film Vakeel Saab trailer launch fans chaos at theater)

हेही वाचा :

Akshay Kumar | अक्षय कुमारने सुरु केले ‘राम सेतु’चे चित्रीकरण, लूकविषयी सांगताना म्हणाला…

TMKOC | ‘आमच्यात वाद? भांडण? छे…!’, ‘जेठालाल’शी ऑफस्क्रीन वादावर ‘तारक मेहता’ म्हणतात…  

Non Stop LIVE Update
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.