AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नापूर्वी रश्मिकाच्या होणाऱ्या सासूने ठेवल्या या 3 अटी; तर सासरे म्हणाले “जात अन् धर्म..”

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. एका मुलाखतीत विजयच्या आईवडिलांनी होणाऱ्या सुनेबद्दलच्या काही अपेक्षा बोलून दाखवल्या होत्या.

लग्नापूर्वी रश्मिकाच्या होणाऱ्या सासूने ठेवल्या या 3 अटी; तर सासरे म्हणाले जात अन् धर्म..
रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 25, 2026 | 11:59 AM
Share

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. 26 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये धूमधडाक्यात लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नाच्या चर्चांदरम्यान विजयच्या आईवडिलांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये विजयची आई माधवी आणि वडील गोवर्धन राव हे त्यांच्या होणाऱ्या सुनेकडून असलेल्या अपेक्षांबद्दल बोलताना दिसत आहेत. 2018 मध्ये विजय आणि रश्मिका यांचा ‘गीता गोविंदम’ हा चित्रपट तुफान गाजला होता. या चित्रपटाच्या यशानिमित्त आयोजित कार्यक्रमात सूत्रसंचालिका सुमाने विजयच्या आईवडिलांना त्यांच्या मुलाच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला होता.

‘गीता गोविंदम’ या चित्रपटात रश्मिकाने विजयच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यामुळे खऱ्या आयुष्यात तुम्हाला कशी सून हवी, असा प्रश्न सुमाने विजयच्या आईवडिलांना विचारला होता. त्यावर विजयची आई म्हणाली, “बाबूची (विजय) चांगली काळजी घेणारी सून हवी, आणखी काही नको. तिने त्याच्यावर नि:स्वार्थ प्रेम केलं पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा आहे. तो फिल्म इंडस्ट्रीत काम करतो, त्यामुळे तिने त्याला समजून घेतलं पाहिजे.” हाच प्रश्न जेव्हा विजयच्या वडिलांना विचारण्यात आला होता, तेव्हा ते म्हणाले, “त्याला ज्या कोणा मुलीशी लग्न करायचं आहे, त्याने करावं. माझा काहीच आक्षेप नाही आणि माझ्या कोणत्या अपेक्षाही नाहीत. जात किंवा धर्माविषयीही माझ्या काही अपेक्षा नाहीत. त्याने भारतीय आणि विशेषकरून दाक्षिणात्य मुलीशी लग्न केलं तर मला आनंद होईल.”

विशेष म्हणजे या कार्यक्रमात खुद्द विजय देवरकोंडानेही लग्नाविषयी त्याचं मत मांडलं होतं. अरेंज मॅरेज हे माझ्यासाठी बनलचं नाही, असं तो म्हणाला. “फक्त लव्ह मॅरेज, पण माझ्या पालकांनाही ती मुलगी आवडली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया विजयने दिली होती. काही दिवसांपूर्वी ‘द गर्लफ्रेंड’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी रश्मिका अप्रत्यक्षपणे विजयबद्दल व्यक्त झाली होती. “सुदैवाने, माझ्या जोडीदाराने मला अशा वेदनांमधून बाहेर काढलं आहे, ज्या त्याने कधीच दिल्या नव्हत्या. त्यामुळे माझ्यासाठी भूमा (चित्रपटातील भूमिकेचं नाव) म्हणून त्याने मला बरं करण्यास मदत केली आहे. हा चित्रपट माझ्यासाठी जसा आहे, तसाच तोही समान आहे. त्यामुळे मी त्याचं कौतुक करू इच्छिते आणि त्याचे आभार मानते”, असं ती म्हणाली होती.

Follow Us
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....