Vikram Vedha Review: कसा आहे हृतिक-सैफचा ‘विक्रम वेधा’? फर्स्ट रिव्ह्यू आला समोर

मोठ्या पडद्यावर सैफ-हृतिकची टक्कर; ॲडव्हान्स बुकिंग करण्यासाठी हे वाचा

Vikram Vedha Review: कसा आहे हृतिक-सैफचा विक्रम वेधा? फर्स्ट रिव्ह्यू आला समोर
Vikram Vedha: मोठ्या पडद्यावर हृतिक-सैफची टक्कर
Image Credit source: Youtube
| Edited By: | Updated on: Sep 27, 2022 | 7:02 PM

मुंबई- अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. हृतिक आणि सैफ या दोन मोठ्या सुपरस्टार्सची पडद्यावर टक्कर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच या चित्रपटाला पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी बॉलिवूडमधल्या कलाकारांसाठी निर्मात्यांनी ‘विक्रम वेधा’च्या स्पेशन स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी या स्क्रिनिंगला पोहोचले होते.

बॉलिवूड चित्रपट समीक्षक उमैर संधू यांनी ‘विक्रम वेधा’चा पहिला रिव्ह्यू शेअर केला आहे. उमैरच्या मते सैफ अली खान आणि हृतिक रोशन यांनी चित्रपटात पैसा वसूल परफॉर्मन्स दिला आहे. त्यामुळे थिएटरमध्ये हा चित्रपट तुमची निराशा करणार नाही. अत्यंत मोजक्या शब्दांत त्यांनी या चित्रपटाचं समीक्षण लिहिलं आहे.

‘विक्रम वेधा हा पैसा वसूल, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आहे. पॉवर पॅक्ड स्क्रीनप्ले, डायलॉग्स आणि क्लायमॅक्स. हृतिकने त्याच्या करिअरमधील सर्वोत्त्म परफॉर्मन्स दिला आहे. पुरस्काराने सन्मान व्हावा असा अभिनय त्याने केला. सैफ अली खानने संपूर्ण शोच आपल्या नावे केला आहे. नक्की जाऊन पहा’, असं ट्विट त्याने केलंय.

विक्रम वेधा पाहिल्यानंतर राकेश रोशन यांनासुद्धा स्तुती करण्याचा मोह आवरला नाही. ‘विक्रम वेधा पाहिला. हा चित्रपट कमाल आहे. त्याचं श्रेय दिग्दर्शक, अभिनेते आणि संपूर्ण टीमला जातं. दमदार’, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं.

करीना कपूरनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम कलाकार, सर्वोत्तम कथा, सर्वोत्तम दिग्दर्शक.. दमदार चित्रपट आहे, ब्लॉकबस्टर’, असं करीनाने लिहिलं.

बॉलिवूड कलाकारांनी ‘विक्रम वेधा’चं कौतुक केल्याने या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात सैफ आणि हृतिकशिवाय राधिका आपटे, शारीब हाश्मी, रोहित सराफ आणि योगिता बिहानी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘विक्रम वेधा’ या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केलं आहे.