आई मजूर, तर तो कॉपी शॉपमध्ये टेबल पुसायचं काम करायचा, 800 रुपये पगार; आता बॉलिवूडचा आहे सुपरस्टार

असा एक अभिनेता ज्याने फार कष्टाने आपलं आयुष्य उभं केलं आहे. ऐकेकाळी कॉफी शॉपमध्ये टेबल पुसण्याचं काम करणारा हा अभिनेता आज बॉलिवूडवर राज्य करतोय. त्याने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आई मजूर, तर तो कॉपी शॉपमध्ये टेबल पुसायचं काम करायचा, 800 रुपये पगार; आता बॉलिवूडचा आहे सुपरस्टार
Vikrant Massey, From Coffee Shop to Bollywood Star
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 30, 2025 | 6:17 PM

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी फार संघर्षातून त्यांचं करिअर घडवलं आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून त्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे. असाच एक अभिनेता आहे ज्याने फार कष्टातून आपली ओळख निर्माण केली आहे. कॉफी शॉपमध्ये काम करणारा हा मुलगा आज चक्क बॉलिवूडवर राज्य करतोय. या अभिनेत्याने एकापेक्षा एक हीट चित्रपट दिले आहेत.

सर्वच कलाकार श्रीमंत कुटुंबात जन्माला येत नाहीत आणि त्यांची फिल्मी पार्श्वभूमीही नसते. अनेक कलाकार कठोर परिश्रम करतात आणि आर्थिक पार्श्वभूमी नसतानाही चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करतात. हा अभिनेता देखील अशाच लोकांपैकी एक आहे. त्याची आई मजूर म्हणून काम करायची तर तोही छोटं- मोठं काम करायचा.

आई शीख आहे तर त्याचे वडिल ख्रिश्चन

हा बॉलिवूड अभिनेता म्हणजे विक्रांत मेस्सी. विक्रांत मेस्सीचा जन्म 1987 मध्ये झाला. त्याची आई शीख आहे तर त्याचे वडिल ख्रिश्चन. त्याच्या मोठ्या भावाने इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्याचे नाव बदलून त्याने मोईदीन ठेवले. अशाप्रकारे, त्याच्या कुटुंबात अनेक धर्म आहेत. आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातून आलेल्या विक्रांतने अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या वडिलांना आलेल्या अडचणींचा उल्लेख केला आहे. त्याची आई घर चालवण्यासाठी बांधकाम कामगार म्हणजे मजूर म्हणून काम करायची. तिने तिच्या मुलांना खूप कमी उत्पन्नात वाढवले.

शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी कॉफी शॉपमध्ये टेबल पुसण्याचं काम करायचा

विक्रांतने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, दर महिन्याच्या 15 तारखेला वडिलांचा पगार संपत असे. तेव्हाच त्यांच्यासाठी खरे संकट सुरू व्हायचे. एके काळी, विक्रांत मेस्सी त्याच्या वडिलांना मदत करण्यासाठी आणि त्याच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी कॉफी शॉपमध्ये टेबल पुसण्यासारखी कामे करत असे.

विक्रांतने सांगितले होते की जेव्हा त्याचे जवळचे मित्र त्याच्या घरी यायचे तेव्हा ते घरात ठेवलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या आणि इतर स्वस्त वस्तू पाहून त्याच्या घरी थांबायचे नाहीत. मात्र त्याने या दिवसांना आपली ताकद बनवली आणि अजून मेहनत करत आधी मालिका आणि नंतर थेट बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावलं आणि खरंच आपली एक खास ओळख निर्माण केली.


आधी मालिका अन् नंतर थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री

२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धूम मचाओ धूम’ या मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, त्यानंतर ‘बालिका वधू’, मग त्याने 2013 मध्ये रणवीर सिंगसोबत ‘लुटेरा’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. अनेक चित्रपटांमध्ये काम करूनही, 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ’12thफेल’ या चित्रपटाने तर संपूर्ण भारतात ओळख मिळवून दिली.

आज मुंबईत एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये राहतोय

एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट प्रचंड हिट झाला आणि याद्वारे लोकांना त्याची प्रतिभा समजली. कधीकाळी छोट्याशा घरात आपल्या कुटुंबासोबत राहणारा मुलगा आज मुंबईत एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये राहतोय. त्याची मालमत्ता 26 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. विक्रांत मेस्सीकडे 12 लाख रुपयांची डुकाटी बाईक आणि 60 लाख रुपयांची वोल्वो एस90 कार आहे.