'या' फोटोमुळे दीपिका पदूकोणच्या गरोदरपणाच्या चर्चांना उधाण

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोणच्या लग्नानंतर आता तिच्या गरोदरपणाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. गेले अनेक दिवसांपासून दीपिका पदूकोण गरोदर असल्याचं बोललं जात होते. मात्र दीपिकाने अनेकदा यावर उत्तर देत म्हटलं आहे की, “जेव्हा आई होण्याची वेळ येईल तेव्हा विचार करेल”. दीपिका पदूकोण आज मेट गाला 2019 या कार्यक्रमात सर्वांना दिसली. तिच्या सौंदर्याचे अनेकांनी आज …

'या' फोटोमुळे दीपिका पदूकोणच्या गरोदरपणाच्या चर्चांना उधाण

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोणच्या लग्नानंतर आता तिच्या गरोदरपणाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. गेले अनेक दिवसांपासून दीपिका पदूकोण गरोदर असल्याचं बोललं जात होते. मात्र दीपिकाने अनेकदा यावर उत्तर देत म्हटलं आहे की, “जेव्हा आई होण्याची वेळ येईल तेव्हा विचार करेल”.

दीपिका पदूकोण आज मेट गाला 2019 या कार्यक्रमात सर्वांना दिसली. तिच्या सौंदर्याचे अनेकांनी आज कौतुक केले. यावेळी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि गायक निक जोनसही या कार्यक्रमात सर्वांना दिसला. या कार्यक्रमानंतर या तिघांनी एकत्र फोटो काढत इंटरनेटवर पोस्ट केला आहे.

प्रियंकाने शेअर केलेल्या फोटोमुळे पुन्हा दीपिका पदूकोण गरोदर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. फोटोमध्ये दीपिका पदूकोण गरोदर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी हा फोटो व्हायरल केला आहे.

 

View this post on Instagram

 

Charlie and the Indian angels end the night… ❤️ #metgala2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

“दीपिकाच्या गरोदरपणाची अफवा हास्यास्पद आहे. हा फोटो चुकीच्या बाजूने घेतला आहे”, असं दीपिका पदूकोणच्या एका जवळच्या व्यक्तीने म्हटले.

दीपिका सध्या मेघना गुलजारच्या ‘छपाक’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती एका अॅसिड पीडित लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे. चित्रपटात विक्रांत मैसीही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *